Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाThiago Messi : बाप से बेटा सवाई, मेस्सीच्या मुलाने 10 हून अधिक गोल मारत संघाला केले विजयी

Thiago Messi : बाप से बेटा सवाई, मेस्सीच्या मुलाने 10 हून अधिक गोल मारत संघाला केले विजयी

Subscribe

लिओनेल मेस्सीचा मोठा मुलगा थियागो मेस्सी हा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुण वयातच फुटबॉलच्या जगात महान कामगिरी करताना दिसत आहे. अंडर-13 एमएलएस चषकाच्या एका सामन्यात थियागो मेस्सीने एक-दोन नाही तर जवळजवळ डझनभर गोल केले आहेत.

नवी दिल्ली : लिओनेल मेस्सीची गणना जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये केली जाते. त्याने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर जगभरात लाखो चाहते बनवले आहेत. त्यामुळे आज फुटबॉलच्या जगात लिओनेल मेस्सीचे ज्या प्रकारे नाव, त्या प्रमाणे भविष्यात त्याच्या मोठ्या मुलाचे नाव त्याच्यापेक्षा मोठे झाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण लिओनेल मेस्सीचा मोठा मुलगा थियागो मेस्सी हा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुण वयातच फुटबॉलच्या जगात महान कामगिरी करताना दिसत आहे. अंडर-13 एमएलएस चषकाच्या एका सामन्यात थियागो मेस्सीने एक-दोन नाही तर जवळजवळ डझनभर गोल केले आहेत. (Thiago Messi scored 11 goals in a single match of the Under-13 MLS Cup)

अंडर-13 एमएलएस चषकाचा सामना 5 फेब्रुवारी रोजी पार पडला. अटलांटा युनायटेड विरुद्धच्या मिनी-मॅचमध्ये थियागो मेस्सीने इंटर मियामी संघाकडून खेळताना 11 गोल ​​केले. तर त्याचा सहकारी डिएगो लुना ज्युनियरने एक गोल केला. यासह इंटर मियामी संघाने अटलांटा युनायटेडवर 12-0 असा शानदार विजय नोंदवला. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आपल्या वडिलांची आयकॉनिक क्रमांक 10 ची जर्सी घालून थियागोने पहिल्या हाफमध्ये पाच गोल केले आणि त्यानंतर सामना संपण्यापूर्वी आणखी सहा गोल केले. त्याने 12 व्या मिनिटाला इंटर मियामीसाठी पहिला गोल मारला. यानंतर 27 व्या, 30 व्या, 35 व्या, 44 व्या, 51 व्या, 57 व्या, 67 व्या, 76 व्या, 87 व्या आणि 89 व्या मिनिटाला त्याने गोल केले.

हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयसनं संधीचं सोनं केलं; विराटच्या अनुपस्थित अय्यरची तुफान फटकेसाठी

थियागो मेस्सी हा इंटर मियामीसाठी आक्रमक मिडफिल्डर म्हणून काम करतो. बॉक्सच्या बाहेर संधी निर्माण करण्याव्यतिरिक्त, 12 वर्षांचा हा खेळाडू अनेकदा विरोधी बॉक्सवर हल्ला करताना आणि त्याच्या फिनिशिंग क्षमता दाखवताना दिसतो. अर्जेंटिनातील रोझारियो येथे जन्मलेला थियागो मेस्सी 2023 मध्ये इंटर मियामी अकादमीमध्ये सामील झाला होता. त्याचवेळी मेस्सीने पॅरिस सेंट-जर्मेन सोडले. यानंतर मियामीला जाण्यापूर्वी थियागोने काही हंगाम बार्सिलोनाच्या युवा संघासाठी देखील खेळले आहेत.

जन्माच्या 72 तासांनंतर क्लबने केले करारबद्ध

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनामधून व्यावसायिक क्लब कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर 2012 मध्ये थियागोचा जन्म झाला. लिओनेल मेस्सीप्रमाणेच त्याच्या मुलालाही फुटबॉलमध्ये रस असेल विश्वास दाखवत अर्जेंटिना क्लब नेवेल्स ओल्ड बॉईजने थियागो मेस्सीला त्याच्या जन्माच्या 72 तासांनंतर करारबद्ध केले होते. यानंतर आता थियागो इंटर मियामी अंडर-13 संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. तो मेस्सीचा माजी बार्सिलोना संघातील सहकारी लुईस सुआरेझचा मुलगा बेंजामिन सुआरेझसोबत खेळताना दिसतो.