घरक्रीडावेळापत्रक बनवताना खेळाडूंचा विचार करा!

वेळापत्रक बनवताना खेळाडूंचा विचार करा!

Subscribe

मायदेशात झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर केवळ पाच दिवसांत न्यूझीलंड दौर्‍याला सुरुवात होणे, ही गोष्ट भारताचा कर्णधार विराट कोहलीला फारशी आवडली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक बनवताना खेळाडूंचाही विचार झाला पाहिजे, असे मत कोहलीने व्यक्त केले. २०२० वर्ष सुरु होऊन अवघे काहीच दिवस झाले असून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळला आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.

आता लवकर अशी वेळ येईल की, खेळाडूंना थेट स्टेडियममध्ये उतरून सामना खेळावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक फारच व्यग्र झाले आहे. त्यातच खेळाडूंना खूप प्रवासही करावा लागतो. न्यूझीलंड आणि भारतामध्ये सात तासांचा फरक आहे. त्यामुळे परिस्थितीशी लगेच जुळवून घेणे अवघड असते. भविष्यात वेळापत्रक बनवताना खेळाडूंचा थोडा विचार केला पाहिजे, असे कोहली म्हणाला. मात्र, सतत सामने खेळण्याचा खेळाडूंना फायदाही होऊ शकतो असे कोहलीला वाटते.

- Advertisement -

आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळलो. त्याआधी आम्ही काही टी-२० सामने खेळलो होतो. मात्र, मागील तीन सामन्यांत आम्ही २० षटकांपेक्षा जास्त वेळ मैदानात होतो. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेच्या तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नसला, तरी या मालिकेत खेळणे आम्हाला थोडे सोपे जाईल. यावर्षी टी-२० विश्वचषक होणार असल्याने प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढले आहे, असे कोहलीने नमूद केले.

विराट मोडेल अनेक विक्रम – स्मिथ

- Advertisement -

भारताचा विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. विराट फारच उत्कृष्ट फलंदाज असून तो अनेक विक्रम मोडले, असा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथला विश्वास आहे. विराट फारच उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याचे आकडेच सर्वकाही सांगतात. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी करतो. आताच अनेक विक्रम त्याच्या नावे असून तो भविष्यात अजून विक्रम मोडेल याची मला खात्री आहे, असे स्मिथने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -