घर क्रीडा IPL 2023 : "हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा...", धोनीने आयपीएल निवृत्तीबाबत केले...

IPL 2023 : “हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा…”, धोनीने आयपीएल निवृत्तीबाबत केले मोठे विधान

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे फक्त देशभरातच नाही तर जगभरात चाहते आहेत. धोनीने आयपीएलच्या या पर्वात शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे फक्त देशभरातच नाही तर जगभरात चाहते आहेत. धोनीने आयपीएलच्या या पर्वात शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चेन्नई संघाने या पर्वात आत्तापर्यंत सहा सामने खेळले आहेत. या सहा सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये त्याने 59 धावा केल्या आहेत. यादरम्यान धोनीची सरासरी 59 आणि स्ट्राइक रेट 210.71 आहे. तर या पर्वात त्याने दोन चौकार आणि सहा षटकार मारले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सध्याच्या आयपीएल हंगामानंतर क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याचा खेळ पाहता यावा, यासाठी आयपीएल सुरू होण्याची उत्सुकता लागलेली असते. दरम्यान, हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा असल्याची माहिती त्याने शुक्रवारी (21 एप्रिल) चेन्नईच्या होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळविल्यानंतर दिली.

- Advertisement -

हेही वाचा – …त्याक्षणी मला पन्नाशीत प्रवेश केल्याची जाणीव झाली – सचिन तेंडुलकर

41 वर्षीय धोनीने स्वतः कबूल केले की त्याला त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे. यंदाचे आयपीएलचे पर्व हे धोनीचे शेवटचे पर्व आहे आणि आयपीएल 2023 नंतर तो निवृत्ती जाहीर करेल अशा चर्चा करण्यात येत आहेत. परंतु याबाबत बोलताना धोनी म्हणाला की, “मी कितीही वेळ खेळलो तरी चालेल, पण हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे. त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना इथे येऊन पाहण्याची संधी मिळाली आहे. इथे येऊन छान वाटतं. प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे. त्यामुळे त्याच्या या विधानामुळे धोनी खरंच या आयपीएलनंतर क्रिकेटमधून पुर्णतः संन्यास घेणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तर त्याच्या या निर्णयामुळे मात्र त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणे देखील निश्चित आहे.

- Advertisement -

शुक्रवारी (ता. 21 एप्रिल) चेन्नई आणि हैद्राबाद या संघांमध्ये सामना खेळला गेला. यामध्ये चेन्नईने हैद्राबादचा पराभव करत या पर्वातील हा चौथा विजय मिळवला. यंदाच्या आयपीएलमध्ये संघाने दोन सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनौ सुपरजायंट्ससह त्यांचे समान गुण आहेत, परंतु राजस्थानचा धावगती सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे आणि यामुळे हा संघ प्रथम स्थानावर आहे. लखनौ दुसऱ्या तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisment -