घरक्रीडा'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेलच का?

‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलच का?

Subscribe

आपण सर्वात स्फोटक बॅट्समन असल्याचं ख्रिस गेलने वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्याच्या आजवरच्या अनेक रेकॉर्ड्समुळेच तो 'युनिव्हर्सल बॉस' म्हणून ओळखला जातो.

क्रिकेट जगतातील सर्वात धडाकेबाज बॅट्समन मानला जाणारा ख्रिस गेल सगळ्याच फॉर्मेटमध्ये धडाकेबाज बॅटिंग करतो. क्रिकेटच्या इतिहासात गेल हा सर्वात स्फोटक फलंदाज मानला जातो. त्याचे कारणही तसेच कारण ख्रिस गेलने आतापर्यंत एकदिवसीय, कसोटी तसेच टी-२० अशा सगळ्याच फॉर्मेट्समध्ये आपल्या बॅटने बरेच रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रविवारी बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात गेलने शाहीद आफ्रिदीच्या ४७६ सिक्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आणि तो पुन्हा एकदा चर्चेत आला.

मुळचा जमैका देशाचा असणारा ३८ वर्षीय ख्रिस गेल हा सध्या वेस्ट इंडिज संघाकडून खेळतो. २००७ ते २०१० च्या दरम्यान गेलने वेस्ट इंडिजकडून कसोटी सामन्यांचे कर्णधारपद देखील सांभाळले होते. गेलने आतंरराष्ट्रीय क्रिकेट सोबतच स्थानिक क्रिकेटमध्येही आपली एक वेगळी छाप सोडली असून भारताच्या इंडियन प्रिमीयर लीगमध्येही गेल हा सर्वोत्कृष्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

हे गेलचे काही खास रेकॉर्ड!

  • ख्रिस गेलने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सामन्यात शतक झळकावले आणि तो ठरला पहिला जगातील बॅट्समन ज्याने एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० अशा सर्वच क्रिकेटच्या फॉर्मेटमध्ये शतक नोंदविले.
  • टी-२० आणि कसोटी अशा दोन्ही फॉर्मेटमध्ये संपूर्ण इनिंग बॅटिंग करणारा ख्रिस गेल हा एकमेव बॅट्समन ठरला आहे.
  • बांग्लादेशविरूद्धच्या टेस्ट मॅचच्या पहिल्याच बॉलवर सिक्स उडवत गेल टेस्ट मॅचच्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारणारा पहिलाच बॅट्समन ठरला.
  • टी-२० क्रिकेटमध्ये १०००० धावांचा टप्पा गाठणारा ख्रिस गेल हा पहिलाच बॅट्समन आहे सध्या टी-२० फॉर्मेटमध्ये सर्वाधिक ११०६८ धावा गेलच्या नावे आहेत.
  • ख्रिस गेलने सर्वात जलद गतीने एकदिवसीय सामन्यात द्विशतक केले असून त्याने २०१५ च्या विश्वचषकात झिम्बॉम्बेविरूद्ध १३८ बॉल्समध्ये २०० धावा केल्या होत्या.
  • टी-२० क्रिकेट फॉर्ममध्ये सर्वात जलद हाफ सेंच्युरू करणारा गेल हा दुसरा बॅट्समन ठरला आहे. त्याने अवघ्या १२ बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केली आहे.
  • टी-२० क्रिकेटमध्ये १०० सिक्स मारत ख्रिस हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा क्रिकेटर ठरला आहे. त्याचसोबत एकाच मॅचमध्ये १८ सिक्स मारत गेल हा एका टी-२० सामन्यात सर्वाधिक सिक्स मारणारा क्रिकेटर ठरला आहे.

यासारखेच अनेक रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावे असून त्याने आतापर्यंत आपण सर्वात स्फोटक बॅट्समन असल्याचा वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्याच्या या आणि यासारख्या अनेक रेकॉर्डमुळेच तो ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -