घरक्रीडामहाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील संघात नाशिकच्या तिघींची निवड

महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील संघात नाशिकच्या तिघींची निवड

Subscribe

बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणार्‍या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या सिन्नर येथील माया सोनवणे, प्रियांका घोडके आणि साक्षी कानडी या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.

काही दिवसांपूर्वी जयपूर येथे सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये माया सोनावणेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिने पहिल्या सामन्यात सिक्कीमविरुद्ध ५ विकेट, तर दुसर्‍या सामन्यात हैदराबादविरुद्ध ४ विकेट घेतल्या. त्यानंतर आसामविरुध्दच्या सामन्यातही तिने १ महत्त्वपूर्ण विकेट घेत महाराष्ट्राच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मागील महिन्यात मायाने सिनियर महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

- Advertisement -

तिने पश्चिम विभागाचेसुद्धा प्रतिनिधित्व केले आहे, तसेच प्रियांका घोडके आणि साक्षी कानडी यांनी १९ वर्षांखालील स्पर्धेमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळेच या तिघींची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -