नवी दिल्ली : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 2 – 0 अशी आघाडी घेतली आहे. शनिवारी (25 जानेवारी) दुसऱ्या सामन्यात एकीकडे सर्व महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर डावखुरा फलंदाज तिलक वर्माने संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याने 55 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या असून एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच, त्याने भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे. तिलकने टी – 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने 500 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. (Tilak Verma has highest average in T20 Cricket)
हेही वाचा : MUM VS JK : जम्मू-काश्मीरचा जलवा, 5 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळणाऱ्या मुंबईचा केला पराभव
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिलक वर्माने 58.91च्या सरासरीने 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याचसोबत त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक सरासरी असलेल्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराटची 48.69 असून त्याने आता टी 20 मधून निवृत्ती घेतली आहे. तसेच, पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानची सरसरी ही 47.41 एवढी आहे. कमी सामन्यांमध्ये तिलकने आपली एक वेगळी छाप भारतीय संघात पाडली आहे. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणाऱ्या निवडक खेळाडूंमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, तो सलग 4 डावांमध्ये तो बाद झालेला नाही. तसेच, त्याने यावेळी तब्बल 300 हून अधिक धावा केल्या आहेत.
दुसऱ्या सामन्यात केलेल्या कामगिरीनंतर तिलक वर्माने सांगितले की, “मी आदल्या दिवसापासून कोच गौतम गंभीर यांच्याशी बोलत होतो. विकेटला दुतर्फा उसळी होती. त्यामुळे यावर त्यांनी पीच कसाही असो तुम्ही परिस्थितीनुसार खेळले पाहिजे,” असा कानमंत्र गंभीरने दिल्याचे सांगितले. तसेच, “जर संघाला प्रति षटक दहा धावांची आवश्यकता असेल, तर तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे, जरी काही कमी धावांची आवश्यकता असली तरीही तुम्ही शेवटपर्यंत उभे राहिले पाहिजे. संघाने चर्चा केली की डाव्या-उजव्या संघाचे संयोजन हा एक चांगला पर्याय असेल, ते विरोधी गोलंदाजांसाठी देखील कठीण असेल. आम्ही दक्षिण आफ्रिकेत आधीच वेगवान गोलंदाज खेळवले होते, त्यामुळे आम्ही आर्चर आणि वूड सारख्या वेगवान गोलंदाजांसाठी तयार होतो. आमच्या खेळाडूंनी चांगली तयारी केली, आम्ही नेटमध्ये कठोर परिश्रम केले आणि आम्हाला त्याचे चांगले फळ मिळाले.” अशा भावना त्याने व्यक्त केल्या.