घरक्रीडाIND vs AUS : टीम पेन आऊट की नॉट-आऊट? ट्विटरवर जोरदार चर्चा 

IND vs AUS : टीम पेन आऊट की नॉट-आऊट? ट्विटरवर जोरदार चर्चा 

Subscribe

शेन वॉर्नच्या मते पेनची बॅट क्रिजच्या बाहेर होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात झाली. या कसोटीत भारताचा पहिला डाव १९५ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला केवळ १३ धावाच करता आल्या. मात्र, तिसऱ्या पंचांचा निर्णय त्याच्या विरोधात गेला असता, तर तो कदाचित त्याहूनही कमी धावा करून धावचीत झाला असता. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ५५ व्या षटकात युवा कॅमरुन ग्रीनने चेंडू मिड-ऑफच्या दिशेने मारला आणि धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नॉन-स्ट्राईकवरील टीम पेन धाव काढण्यासाठी फारसा उत्सुक नव्हता. मात्र, त्याने अखेर धावण्याचा निर्णय घेतला. मिड-ऑफवरून उमेश यादवने चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला आणि पंतने बेल्स उडवण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्यामुळे पेन धावचीत झाला आहे की नाही, याचा निर्णय मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे (थर्ड अंपायर) सोपवला.

रि-प्लेच्या एका अँगलमध्ये पेनची बॅट क्रिजच्या थोडी बाहेर असल्याचे दिसत होते. तर आणखी एका अँगलमध्ये पेनच्या बॅटचा थोडा भाग क्रिजच्या आत असल्याचे दिसले. रि-प्लेमधून काही स्पष्ट होत नसल्याने अखेर तिसरे पंच पॉल रायफल यांनी पेनला नाबाद ठरवले. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या मते पेनची बॅट क्रिजच्या बाहेर होती. त्यामुळे पेनला बाद ठरवले पाहिजे होते असे वॉर्न म्हणाला. वॉर्नच्या या विधानामुळे ट्विटरवर बरीच चर्चा रंगली. बऱ्याच ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या मते पेन नाबाद होता, तर पेनला बाद ठरवणे जास्त योग्य ठरले असते असे मत भारतीय चाहत्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -