Tim Paine ‘sexting’ case: टिम पेनचे Sexting Scandal उघडकीस, दिला राजीनामा

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंडविरूध्द पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या नामांकित अॅशेज मालिकेपूर्वी पेनने राजीनाम्याची घोषणा केल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्याने एका महिला सहरकाऱ्याला अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह फोटो पाठवल्यामुळे हा अचानक राजीनामा दिला आहे. अचानक राजीनामा दिल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. टिम पेनने पत्रकार परिषद घेवून राजीनामा घेत असल्याची माहिती दिली. “मी ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा अवघड निर्णय असला तरी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबाासाठी आणि मुख्य म्हणजे क्रिकेटसाठी अतिशय योग्य असल्याचे पेनने सांगितले.

चार वर्षांपूर्वी एका महिला सहकाऱ्याला पाठवलेल्या अश्लील मेसेजमुळे त्याने हा राजीनामा दिला आणि त्याचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान टिम पेनच्या जागेवर आता कसोटी संघाच्या कर्णधारपदी पॅट कमिंन्सची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील अॅशेज मालिकेला ८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.

 टिम पेन म्हणाला…

“मी आज राजीनाम घेत आहे याचे कारण चार वर्षांपूर्वीचे एक प्रकरण आहे. त्यावेळी मी एका सहकाऱ्याला केलेल्या मेसेजची ऑस्ट्रेलिया क्रिकेटने चौकशी केली आहे. मी देखील चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. त्या प्रकरणात माझ्याकडून कोणत्याच नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे देखील सिध्द झाले आहे. मी या प्रकरणातून मुक्त झालो आहे आणि त्या प्रकरणाबदद्ल माझ्या मनात तीव्र नाराजी आजही आहे. मला माझ्या कुटुंबाने त्याबदद्ल माफ देखील केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. ती घटना संपली आहे आणि मी आता ते विसरून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले होते आणि मागील ३-४ वर्षामध्ये मी तेच करत आलो आहे”. अशा शब्दांत पेनने राजीनाम्यावर स्पष्टीकरण दिले.

पेनने आणखी सांगितले की, “ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून अचानक राजीनामा घेतला त्याबद्दल त्यांची दिलगीरी व्यक्त करतो. त्यांची माफी मागत आहे. संपूर्ण क्रिकेट परिवाराकडून मला खूप प्रेम मिळाले आहे त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पुढच्या महिन्यात होणारी अॅशेजची मालिका महत्त्वाची आहे आणि मी त्याआधीच संघाची साथ सोडली त्याबद्दल मला माफ करा. मी ऑस्ट्रेलियन संघाच्या समर्थकांसोबत आणि संघासोबत कायम सोबत असणार आहे”. असे पेनने म्हटले.

पेनच्या अचानक राजीनाम्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला अॅशेज मालिकेपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. पेन नंतर पॅट कमिंन्स कसोटी संघाचा कर्णधार बनू शकतो तो कित्येक वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून कारभार सांभाळत आहे.


हे ही वाचा: http://राहुल द्रविड भारताचे कोच आहेत हे धक्कादायक; रिकी पाँटिंग म्हणाला…