Tokyo Olympic 2020 : भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत, बेल्जियमकडून भारताचा ५-२ असा पराभव

भारताने २-१ ने आघाडी घेतली आणि बेल्जियमचे आव्हान संपुष्टात आणल होते.

Tokyo Olympic 2020 Indian hockey team loses semi-finals, India beat Belgium 5-2
Tokyo Olympic 2020 : भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत, बेल्जियमकडून भारताचा ५-२ असा पराभव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने सोमवारी उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर आज भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्या सत्रात वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमला पिछाडीवर टाकलं होते. मात्र बेल्जियमकडून भारताचा पराभव झाला आहे. बेल्जियमने भारताचा ५-२ असा पराभव केला आहे. भारताचा पराभव झाला असल्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले आहे. परंतू भारतीय संघ अजूनही कांस्यपदकावर दावा करु शकतो. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमधील पराभूत संघासोबत प्लेऑफमध्ये कांस्य पदकासाठी दावा करु शकतो.

बेल्जियम हा जगातला एक क्रमांकाचा संघ आहे. भारताने पहिल्या सत्रात चांगला खेळ केला, पण नंतरचे तीन सत्र गमावले. विशेषतः प्रतिस्पर्ध्याला मोठ्या संख्येने पेनल्टी कॉर्नर देत वरचढ होण्याची संधी दिली आणि पराभव भारतीय संघाने पराभव ओढून घेतला आहे. पहिल्या सत्रात भारतीय संघाने बेल्जियमला २-१ असं पिछाडीवर टाकले होते. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीवर होते. या सत्रात बेल्जियमला अधिक पेनल्टी कॉर्नर मिळाले होते यावर भारतीय संघाला लगाम घालणे आवश्यक आहे. पण, ४१ वर्षांनंतर भारताची ओळीम्पिक मध्ये प्रथमच चांगली कामगिरी झाली हे विसरता येत नाही.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सामन्याच्या पहिल्या सत्रात बेल्जियमने एक गोल करुन आघाडी घेतली होती परंतू काही वेळातच भारताने २-१ ने आघाडी घेतली आणि बेल्जियमचे आव्हान संपुष्टात आणल होते. परंतू यानंतर बेल्जियमने भारताला गोल डागण्याची एकही संधी दिली नाही. या सामन्यात बेल्जियमला १४ पेनल्टी कॉर्नर मिळाले याचा बेल्जियमने उत्तम फायदा घेत भारताचे आव्हान संपुष्टात आणले आहे.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले तर तिसऱ्या सत्रात भारतीय संघास पाचवा पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतू भारतीय संघाला गोल करता आला नाही. चौथ्या सत्रात बेल्जियला पेनल्टी स्टोक मिळाला तेव्हा बेल्जियने गोल करुन भारताचा ५-२ असा पराभव केला आहे.