घरक्रीडाTokyo Olympics : भारताला 'जोर का झटका'; मनिका बात्रा स्पर्धेतून आऊट

Tokyo Olympics : भारताला ‘जोर का झटका’; मनिका बात्रा स्पर्धेतून आऊट

Subscribe

मनिकाने तिसऱ्या फेरीतील सामना ०-४ अशा मोठ्या फरकाने गमावला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतासाठी विसरण्याजोगा ठरत आहे. तलवारबाजीत भवानी देवी, टेनिसमध्ये सुमित नागल, तिरंदाजीत भारतीय पुरुष संघ यांच्यापाठोपाठ टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रावरही स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली. महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मनिकाला १० व्या सीडेड ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोव्हाने ०-४ (८-११, २-११, ५-११, ७-११) असे पराभूत केले. पोल्कानोव्हाला पहिल्या दोन फेरीत बाय मिळाला होता, तर मनिकाने तिचे पहिल्या दोन्ही फेरीतील सामने जिंकले होते. परंतु, पोल्कानोव्हाविरुद्ध मनिकाला चांगला खेळ करता आला नाही.

ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले

महिला फेरीतील तिसऱ्या फेरीच्या या सामन्यात मनिकाने पहिल्या गेममध्ये पोल्कानोव्हाला झुंज दिली. परंतु, पोल्कानोव्हाने मोक्याच्या क्षणी तिचा खेळ उंचावत हा गेम जिंकला. यानंतर मनिकाचा खेळ खालावला. पोल्कानोव्हाने मात्र उत्कृष्ट खेळ सुरु ठेवत हा सामना ४-० असा मोठ्या फरकाने जिंकला. या पराभवामुळे मनिकाचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. तिला मिश्र दुहेरी शरथ कमलच्या साथीने खेळताना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -

मनिकाची कौतुकास्पद कामगिरी 

मनिकाने महिला एकेरीच्या पहिल्या दोन फेरीत कौतुकास्पद कामगिरी केली. पहिल्या फेरीत तिने ब्रिटनच्या टिन-टिन होचा ४-० असा पराभव केला होता. दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत ६२ व्या स्थानी असलेल्या मनिकाने जागतिक क्रमवारीतील ३२ व्या स्थानावरील युक्रेनच्या मार्गारेटा पेसोत्सकाला पराभवाचा धक्का दिला होता. तिने हा सामना ४-३ (४-११, ४-११, ११-७, १२-१०, ८-११, ११-५, ११-७) अशा फरकाने जिंकला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -