घरक्रीडाTokyo Olympics : नीरज चोप्रा उत्तमच, पण मला पराभूत करणे अवघड; जर्मनीच्या...

Tokyo Olympics : नीरज चोप्रा उत्तमच, पण मला पराभूत करणे अवघड; जर्मनीच्या भालाफेकपटूचा दावा

Subscribe

नीरजने कितीही चांगला खेळ केला, तरी त्याचे आव्हान परतवून लावण्याचा वेट्टरला विश्वास आहे.  

भारतीय पथकाकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. भारताचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राला यंदा पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा पदकांचा दुष्काळ संपवण्याचा नीरजचा प्रयत्न आहे. परंतु, त्याच्यापुढे जर्मनीच्या योहानेस वेट्टरसारख्या खेळाडूचे आव्हान असणार आहे. माजी विश्वविजेता वेट्टर यंदा सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. नीरजने कितीही चांगला खेळ केला, तरी त्याचे आव्हान परतवून लावण्याचा वेट्टरला विश्वास आहे.

त्याला माझा सामना करावा लागणार

नीरज उत्तम खेळाडू आहे. त्याने यावर्षी दोनदा चांगल्या कामगिरीची नोंद केली होती. फिनलंडमध्ये त्याने ८६ मीटरहूनही अधिक अंतरावर भाला फेकला होता. त्याचे भालाफेकीचे तंत्र उत्कृष्ट आहे. तो आता पूर्णपणे फिट असल्याने अधिक लांब भालाफेक करू शकेल. परंतु, त्याला माझा सामना करावा लागणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ९० मीटरहून लांब भालाफेक करण्याचे माझे लक्ष्य आहे. त्यामुळे मला पराभूत करणे नीरजला अवघड जाईल, असा वेट्टरने दावा केला.

- Advertisement -

एकाच जागी करत होते सराव 

नीरज आणि वेट्टर हे दोघेही २०१८ मध्ये जर्मनीत एकाच जागी सराव करत होते. नीरजने जर्मन प्रशिक्षक वेर्नर डॅनियल्स यांच्या मार्गदर्शनात सराव केला होता. तिथे झालेल्या स्पर्धेत नीरजला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत वेट्टरनेच अव्वल क्रमांक पटकावला होता. तीन वर्षांनंतर हे दोघे फिनलंड येथे एकत्र खेळले. त्यावेळी वेट्टरने ९३.५९ मीटर लांब भालाफेक करत सुवर्णपदकाची कमाई केली, तर नीरजने ८६.७९ मीटर अंतरावर भाला फेकत कांस्यपदक मिळवले होते. आता टोकियो ऑलिम्पिकमध्येही हे दोघे एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -