घरक्रीडाTokyo Olympics Closing Ceremony: टोकियो ऑलिम्पिकचा सोनेरी शेवट, भारतीयांची मान उंचावणारे फोटो

Tokyo Olympics Closing Ceremony: टोकियो ऑलिम्पिकचा सोनेरी शेवट, भारतीयांची मान उंचावणारे फोटो

Subscribe

जपानची राजधानी टोकियोमध्ये रंगतदार कार्यक्रमाने आज ऑलिम्पिक खेळांचा सांगता समारंभ झाला. सांगता समारोहाला संपूर्ण मैदानाला विविध रंगाची रोषणाई करण्यात आली होती. यावेळी समारोहाची सुरुवात भव्यदिव्य आतिषबाजीने करण्यात आली. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्य पद जिंकत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ट्रॅक अँड फील्डमध्ये भारताला ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच पदक मिळाले तेही थेट सुवर्ण. ऑलिम्पिकच्या शेवटच्या समारंभात जेव्हा भारताचा तिरंगा फडकताना दिसला, तेव्हा प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलली.

‘बजरंग बली’ हातात तिरंगा धरून पुढे सरकला

कुस्तीपटू बजरंग पुनियाने ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारतीय दलाचे नेतृत्व केले. या सुंदर क्षणाचे कौतुक करावे तितके कमी आहे. जेव्हा बजरंग पुनियाने हातात तिरंगा धरुन १३५ कोटी देशवासियांची मान अभिमानाने उंचावली. बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय कुस्तीपटू ठरला.

- Advertisement -
swag of indian contingent at closing ceremony of tokyo olympics 2020 see photos
‘बजरंग बली’ हातात तिरंगा धरून पुढे सरकला

अभिमानाचा क्षण

swag of indian contingent at closing ceremony of tokyo olympics 2020 see photos
Tokyo Olympics Closing Ceremony: टोकियो ऑलिम्पिकचा सोनेरी शेवट, भारतीयांची मान उंचावणारे फोटो

ऑलिम्पिकच्या समाप्तीपासून भारतीय दल सेल्फी घेत असल्याचे चित्र समोर आले आहेत. ज्यात रवी दहिया, बजरंग पुनियासह ५ खेळाडू दिसत आहेत. मात्र अनेक जण नीरज चोप्राच्याही शोधात होते. ज्याने ट्रॅक अँड फील्डमध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले. नीरज चोप्राच्या सुवर्ण फेकीने भारताला या ऑलिम्पिकमध्ये एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले.  एथलेटिक्समध्ये 100 वर्षांत पहिल्यांदा भारताच्या नीरजने सुवर्णपदक जिंकून दिलं.

swag of indian contingent at closing ceremony of tokyo olympics 2020 see photos

ऑलिम्पिकच्या समाप्तीपासून भारतीय दल सेल्फी घेत असल्याचे चित्र समोर आले आहेत.

विश्व विजयी तिरंगा प्यारा


IDBI Bank बँकेच्या विक्री व्यवस्थापनेसाठी सात कंपन्यांनी लावली बोली, १० ऑगस्टला होईल निर्णय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -