Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics 2020: भारतासाठी ऐतिहासिक क्षण , हॉकी संघाने ४१ वर्षांनी मिळवले...

Tokyo Olympics 2020: भारतासाठी ऐतिहासिक क्षण , हॉकी संघाने ४१ वर्षांनी मिळवले ऑलिम्पिक पदक

Subscribe

भारताने शानदार खेळी करत ५:४ ने जर्मनीचा पराभव केला

भारतीय पुरुष हॉकी संघानं ४ दशकांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा धुव्वा उडवत ५:४ असा विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय संघाने मोठा इतिहास रचला आहे. भारताने १९८० साली पहिल्यांदा हॉकीमध्ये पदक मिळवले होते यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदक मिळवले आहे. भारताने शानदार खेळी करत ५:४ ने जर्मनीचा पराभव केला आहे. जर्मनीविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय टीमने संघात कोणताही बदल केला नव्हता. मात्र आपल्या उत्तम खेळीने भारताला पदक मिळवून दिलं आहे.

भारतीय हॉकी संघाच्या विजयात कर्णधार मनप्रीत, गोलरक्षक श्रीजेश आणि प्रशिक्षक ग्रहम रीड यांनी मोठा वाटा उचलला. जर्मनीविरुद्ध हॉकीचा सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्येच जर्मनीने आपला पहिला गोल डाकला होता. गोलरक्षक श्रीजेशने जर्मनीचे पहिले दोन गोल माघारी धाडले होते. परंतू जर्मनीच्या आक्रमक खेळीने सामना सुरु होताच पहिल्या सत्रात जर्मनी आघाडीवर होती. यानंतर भारतीय संघाने जोरदार प्रत्युत्तर खेळी करत १ गोल डागल्यामुळे भारताने १-१ अशी बरोबरी केली होती.

- Advertisement -

जर्मनीने पुन्हा आक्रमक खेळी करत २ गोल डागले आणि भारताविरुद्ध ३-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने वापसी करत ३ गोल डागले आणि जर्मनीचा ३-३ असा बरोबरीचा सामना केला. हार्दीक सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी गोल डागत भारताची बरोबरी करुन दिली होती. दुसरा गोल हार्दिक सिंह ने पेनल्टी कॉर्नरवर डागला होता तर तिसरा गोल हरमनप्रीत सिंह ने पेनल्टीच्या सहाय्याने डागला होता. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने २ तर भारताने ३ असे एकूण ५ गोल केले.

- Advertisement -

तिसऱ्या क्वार्टरला सुरु होऊन ३ मिनिटानंतर रुपिंदर पाल सिंह ने पेनल्टी कॉर्नरवर गोल डागत भारताने जर्मनीविरुद्ध ४-३ ने आघाडी केली. यानंतर सिमरनजीतने भारताला ५ वा गोल मिळवून दिला आणि जर्मनीविरुद्ध आघाडी घेतली यामुळे भारतीय संघ तिसऱ्या क्वार्टरमध्ये ५-३ असा आघाडीवर होता. सिमरनजीतने ५ वा गोल डागत याच सामन्यातील आपला दुसरा गोल पुर्ण केला होता. भारतीय संघाकडून जर्मनीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो यशस्वीही झाला आहे. तिसऱ्या क्वार्टरनंतरचे १५ मिनिट भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच जर्मनीने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत भारताविरुद्ध चौथा गोल डागला होता. अंतिम क्वार्टरमध्ये जर्मनी भारताकडून असलेलं आव्हान संपुष्टात आणण्यासाठी आक्रमक खेळत होती. मनदीप सिंह याला सातव्या मिनिटाला ६ वा गोल डागण्याची संधी मिळाली होती परंतू गोल डागण्यात तो अपयशी ठरला यामुळे ही खेळी ५-४ अशीच राहिली आणि भारताने जर्मनीवर विजय मिळवला आहे. गेल्या ४ दशकांनंतर भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -