घरक्रीडाTokyo Olympics 2020: बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक, इराणी मल्लाला दाखवले आस्मान

Tokyo Olympics 2020: बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक, इराणी मल्लाला दाखवले आस्मान

Subscribe

उपांत्यपूर्व फेरीत बजरंग पुनिया मोर्टेझा घियासीला चीत करुन उपांत्य फेरीत पोहचला

भारताचा कुस्तीगीर बजरंग पुनिया टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक दिली. आज त्याने सलामीच्या लढतीत इराणी मल्लाला अस्मान दाखवले. प्रतिस्पर्ध्याला त्याने गुणांवर नाही तर चितपट मारले, हे विशेष आहे. बजरंगच्या उजव्या गुडघ्याला दुखापत असल्याने इराणी मल्लाने तिथेच हल्ला करत पहिला गुण मिळवला. मात्र नंतर बजरंगने संधी मिळताच इराणीला नमवले. बजरंग पुनियाने इराणी मल्लाविरोधात २-१ ने विजय मिळवला आहे. बजरंग पुनिया पदकाच्या जवळ पोहचले असून भारताला त्यांच्याकडून सुवर्ण पदकाची आशा आहे. बजरंग पुनियाला या ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमधील आजचा दिवस फार महत्वाचा आहे. उपांत्यपूर्व फेरीत बजरंग पुनियाने प्रतिस्पर्धी मल्लाला चीतपट केलं आहे. पुनियाच्या पायाला दुखापत झाली असून प्रतिस्पर्धी याचा फायदा घेत बजरंगवर आक्रमक झाला होता. यामुळे प्रतिस्पर्धी इराणी मल्लाला एक पॉइंट देखील मिळाला होता. परंतू चोख नजर ठेवून बजरंग पुनियाने प्रतिस्पर्ध्याचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे. बजरंग पुनियाने सेमी फायनलमध्ये एंन्ट्री केली असून आजच सेमीफायनल होणार आहे.

- Advertisement -

भारतीय कुस्तीगीर बजरंग पुनीयाने प्री क्वार्टर फायनल फेरीत किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातलिवेला चितपट करुन उपांत्य पूर्व फेरीत धडक दिली आहे. एर्नाजर सोबतचा सामना रोमांचक झाला होता. दोघांचीही या सामन्यात ३-३ अशी बरोबरी होती. मात्र बजरंग २ पॉइंट घेण्यात यशस्वी झाला होता यामुळे त्याला विजय मिळवता आला. बजरंग पुनिया ६५ किलो वजनी गटातील कुस्तीगीर आहे. उपांत्यपूर्व फेरीत बजरंग पुनिया मोर्टेझा घियासीला चीत करुन उपांत्य फेरीत पोहचला आहे.

- Advertisement -

सीमा बिलासला अपयश

भारतीय कुस्तीपटू सीमा बिसला ६५ किलो वजनी गटातील आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सीमा बिसला कांस्य पदकासाठी प्रयत्न करत होती. मात्र सीम बिसलाला अपयश आलं आहे.


हेही वाचा : भारतीय महिला हॉकी संघ कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत, ग्रेट ब्रिटनचा ४-३ नं विजय


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -