Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Tokyo Olympics : अमित पांघल थेट उप-उपांत्यपूर्व फेरीत; भारतीय बॉक्सर्सना अवघड आव्हान

Tokyo Olympics : अमित पांघल थेट उप-उपांत्यपूर्व फेरीत; भारतीय बॉक्सर्सना अवघड आव्हान

विक्रमी नऊ भारतीय बॉक्सर्स ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे.

Related Story

- Advertisement -

अव्वल सीडेड आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या अमित पांघलसह भारताच्या चार बॉक्सर्सना टोकियो ऑलिम्पिकमध्ये बाय मिळाला असून ते थेट उप-उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. गुरुवारी बॉक्सिंगची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली. भारताच्या बॉक्सर्सना अवघड आणि आव्हानात्मक सामने मिळाले आहेत. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एकाही बॉक्सरला पदक जिंकता आले नव्हते. यंदा मात्र विक्रमी नऊ भारतीय बॉक्सर्स टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे.

पांघलचा पहिला सामना ३१ जुलैला 

- Advertisement -

५२ किलो वजनी गटात अमित पांघल थेट ३१ जुलैला बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार असून उप-उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. या फेरीत त्याचा बोत्सवानाच्या महोम्मद राजाब ओतूकिले आणि कोलंबियाच्या यूबेर्जेन हेन्री रिवास मार्टिनेझ यांच्यातील विजेत्याशी सामना होईल. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये मार्टिनेझने रौप्यपदकाची कमाई केली होती. यंदा मात्र एशियाडमधील सुवर्णपदक विजेत्या अमित पांघलकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागू शकेल.

मेरीचा सामना मिग्वेलीना हर्नांडेझशी

महिलांमध्ये ५१ किलो वजनी गटात भारताची मेरी कोम २५ जुलैला पहिल्यांदा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरेल. तिचा डोमिनिकच्या मिग्वेलीना हर्नांडेझशी सामना होईल. हा सामना जिंकल्यास पुढील फेरीत तिच्यासमोर तिसऱ्या सीडेड इंग्रीट व्हिक्टोरिया वेलंसियाचे आव्हान असेल. वेलंसिया ही २०१६ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती असून तिने पॅन अमेरिकन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

- Advertisement -