घरक्रीडाTokyo Olympics : कुस्तीपटू बजरंग पुनिया सुवर्णपदकाच्या शर्यतीतून आऊट; शनिवारी कांस्यसाठी लढणार

Tokyo Olympics : कुस्तीपटू बजरंग पुनिया सुवर्णपदकाच्या शर्यतीतून आऊट; शनिवारी कांस्यसाठी लढणार

Subscribe

बजरंगला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारताला मोठा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाला पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अझरबैजानच्या हाजी अलीयेव्हने १२-५ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. यंदा बजरंगला सुवर्णपदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने पहिल्या दोन सामन्यांत उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. परंतु, उपांत्य फेरीत त्याला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. त्यामुळे बजरंग सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद झाला असून शनिवारी कांस्यपदकासाठी लढणार आहे.

अलीयेव्हला रोखण्यात बजरंग अपयशी

रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या अलीयेव्हविरुद्ध बजरंगला चांगला खेळ करता आला नाही. अलीयेव्हने सुरुवातीपासूनच बजरंगच्या पायावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने दोनदा बजरंगला गादीवर लोळवत दोन-दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे सहा मिनिटांच्या या लढतीत मध्यंतराला बजरंग १-४ असा पिछाडीवर पडला. दुसऱ्या सत्रात बजरंगने आक्रमक शैलीत खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचा फायदा अलीयेव्हलाच झाला. त्याने चांगला बचाव करतानाच उत्कृष्ट प्रतिहल्ला केला. त्यामुळे त्याला ८-१ अशी भक्कम आघाडी मिळाली. बजरंगने यानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला फारसे यश आले नाही. त्याने हा सामना ५-१२ असा गमावला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -