घरक्रीडाTokyo Olympics : बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत पराभूत; कांस्यपदक निश्चित

Tokyo Olympics : बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत पराभूत; कांस्यपदक निश्चित

Subscribe

भारताचे हे यंदाच्या ऑलिम्पिकमधील एकूण तिसरे पदक ठरले.

भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचे ऑलिम्पिक पदार्पणात सुवर्ण कामगिरी करण्याचे स्वप्न भंगले. लोव्हलिनाला बुधवारी झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार विश्वविजेत्या बुसेनाझ सुरमेनेलिने ०-५ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले. या पराभवामुळे तिला कांस्यपदक मिळणार हे आता निश्चित झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणारी ती विजेंदर सिंग (२००८) आणि मेरी कोम (२०१२) यांच्यानंतरची तिसरी भारतीय बॉक्सर ठरली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक 

उपांत्य फेरीत पराभव झाला असला तरी लोव्हलिना पदक मिळणार हे निश्चित आहे. भारताचे हे यंदाच्या ऑलिम्पिकमधील एकूण तिसरे पदक ठरले. याआधी वेटलिफ्टर मीराबाई चानू (रौप्य) आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (कांस्य) यांनी भारताला पदके मिळवून दिली होती. लोव्हलिनाच्या कामगिरीचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. ‘छान लढली लोव्हलिना. बॉक्सिंग रिंगमध्ये तिला मिळालेले यश असंख्य भारतीयांना प्रेरणा देईल. ती ज्या जिद्दीने खेळली, ते कौतुकास्पद होते. कांस्यपदक जिंकण्याबद्दल तिचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,’ असे मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -