घरक्रीडाटोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये न झाल्यास रद्द

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये न झाल्यास रद्द

Subscribe

आयओसी अध्यक्षांची माहिती

करोनामुळे यावर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि जपानी आयोजक ही स्पर्धा यंदा ठरल्याप्रमाणेच घेण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या दबावामुळे आयओसीने मार्चमध्ये टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत पार पडणार आहे. मात्र, तोपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास ही स्पर्धा आणखी पुढे ढकलावी लागेल असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे म्हणाले होते. परंतु, टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये न झाल्यास, ही स्पर्धा रद्द करावी लागेल असे आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी स्पष्ट केले आहे.

अगदी खरे सांगायचे तर, आम्ही ३००० ते ५००० जणांना सतत आयोजन समितीवर ठेवू शकत नाही. दरवर्षी मोठ्या क्रीडा संघटनांच्या खेळांच्या वेळापत्रकात बदल करणे अशक्य आहे. यामुळे खेळाडूंच्या मनात बर्‍याच शंका निर्माण होतात. तसेच याचा पुढील ऑलिम्पिक स्पर्धांवर परिणाम होईल. आम्ही टोकियो ऑलिम्पिकसाठी विविध योजना आखल्या आहेत. ऑलिम्पिक पुढील वर्षी जूनमध्ये सुरू होणार हे आमचे ठरले आहे. ही स्पर्धा घेणे आव्हान असणार आहे. आम्हाला बर्‍याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. २३ जुलै २०२१ ला परिस्थिती कशी असेल याबाबत अधिक स्पष्टता आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे बॅच यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -