Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Tokyo Olympics : ऑलिम्पिक अचानक रद्द करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही;...

Tokyo Olympics : ऑलिम्पिक अचानक रद्द करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही; आयोजन समिती अध्यक्षांचे विधान

बहुतांश स्थानिक नागरिकांचा ऑलिम्पिकला विरोध आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा टोकियोमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करताना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि आयोजकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. २३ जुलैपासून होणारे यंदाचे ऑलिम्पिक प्रेक्षकांविना घ्यावे लागत आहे. त्यातच आता ऑलिम्पिक क्रीडानगरीत कोरोनाचा शिरकाव झाला असून काही खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आयओसी आणि आयोजकांची चिंता वाढत असून ऑलिम्पिक अचानक रद्द करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूचक विधान आयोजन समितीचे अध्यक्ष तोशिरो मुटो यांनी केले आहे.

योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ

कोरोनाबाबत काहीही सांगणे अवघड आहे. पुढे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढेल किंवा कमी होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, बाधितांची संख्या वाढल्यास आम्ही चर्चा करत राहू. कोरोनाची स्थिती पाहून आम्ही चर्चा करणार असल्याचे आमचे आधीच ठरले आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या वाढेल किंवा कमी होईल. त्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. योग्य वेळ आल्यावर आम्ही ऑलिम्पिकबाबतचा निर्णय घेऊ, असे मुटो यांनी स्पष्ट केले.

मुटो यांचे सत्ताधाऱ्यांशी जवळचे संबंध

- Advertisement -

कोरोनामुळे मागील वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. परंतु, टोकियोतील कोरोनाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे. त्यामुळे बहुतांश स्थानिक नागरिकांचा या स्पर्धेला विरोध आहे. परदेशातून येणाऱ्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची स्थानिक नागरिकांना भीती आहे. या परिस्थितीची मुटो यांना कल्पना आहे. मुटो यांचे जपानमधील सत्ताधाऱ्यांशी जवळचे संबंध आहेत. तसेच ते कोणतेही विधान करण्याआधी बराच अभ्यास आणि विचार करतात. त्यामुळे त्यांनी ऑलिम्पिकबाबत केलेले सूचक विधान आयओसीची चिंता वाढवू शकेल.

- Advertisement -