घरक्रीडाTokyo Olympics : कोरोनाचा वाढता धोका? चेक प्रजासत्ताक व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पॉझिटिव्ह

Tokyo Olympics : कोरोनाचा वाढता धोका? चेक प्रजासत्ताक व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक पॉझिटिव्ह

Subscribe

आतापर्यंत ऑलिम्पिकशी संबंधित एकूण ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. मंगळवारी चेक प्रजासत्ताक बीच व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक सिमॉन नौश यांना कोरोनाची बाधा झाली. ऑलिम्पिक क्रीडानगरीत कोरोनाची बाधा झालेले ते एकूण पाचवे व्यक्ती ठरले. त्याआधी सोमवारी चेक प्रजासत्ताक पुरुष बीच व्हॉलीबॉल संघाचा खेळाडू ओंद्रे पेरूसीचला कोरोना झाल्याची माहिती देण्यात आली होती. तसेच मंगळवारी एका स्वयंसेवकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत ऑलिम्पिकशी संबंधित एकूण ६७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सात कंत्राटदारांना कोरोनाची बाधा

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या चेक संघातील आणखी एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. सातत्याने होणाऱ्या अँटीजेन चाचणीमुळे बीच व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक सिमॉन नौश यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चेक ऑलिम्पिक समितीकडून सांगण्यात आले. दरम्यान, एका स्वयंसेवकासह सात अन्य सात कंत्राटदारांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांकडून देण्यात आली.

- Advertisement -

नेमबाजांना जाणवतोय उष्णतेचा त्रास 

भारतासह अन्य देशांच्या नेमबाजांनी ऑलिम्पिक क्रीडानगरीत सरावाला सुरुवात केली आहे. परंतु, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सराव करण्यासाठी एकच जागा असल्याने ५० मीटर, २५ मीटर आणि १० मीटर अशा विविध प्रकारांतील नेमबाजांना आलटूनपालटून सराव करावा लागत आहे. तसेच टोकियोतील उष्ण आणि दमट हवामानाचाही त्यांना त्रास जाणवत आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -