Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : भारताच्या पुरुष हॉकी संघाची न्यूझीलंडवर मात; सलामीच्या लढतीत ३-२...

Tokyo Olympics : भारताच्या पुरुष हॉकी संघाची न्यूझीलंडवर मात; सलामीच्या लढतीत ३-२ असा विजय

हरमनप्रीतने सलग दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर रुपिंदरलाही गोल करण्यात यश आले.

Related Story

- Advertisement -

उपकर्णधार हरमनप्रीत सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांच्या गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिल्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ अशी मात केली. या सामन्यात भारताने तिन्ही गोल हे पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून केले. हरमनप्रीतने सलग दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर रुपिंदरलाही गोल करण्यात यश आले. भारताच्या महिला संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. हॉलंडने महिलांच्या सलामीच्या लढतीत भारताला १-५ असे पराभूत केले.

भारताच्या पुरुष हॉकी संघाला मात्र टोकियो ऑलिम्पिकची विजयी सुरुवात करण्यात यश आले. या सामन्यात सहाव्या मिनिटाला केन रसेलने गोल करत न्यूझीलंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, चार मिनिटांनंतर रुपिंदर पालने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी दिली. दुसऱ्या सत्रात २६ व्या मिनिटाला, तर तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला हरमनप्रीतने सलग दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केल्याने भारताला ३-१ अशी आघाडी मिळाली.

- Advertisement -

यानंतर न्यूझीलंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ४३ व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या स्टिफन जेनेसने गोल केला. परंतु, पुढे भारताचा गोलरक्षक श्रीजेशने उत्कृष्ट खेळ केल्याने न्यूझीलंडला तिसरा गोल करता आला नाही. त्यामुळे भारताने हा सामना ३-२ असा जिंकला. भारताच्या महिला संघाला मात्र सलामीचा सामना जिंकता आला नाही.

- Advertisement -