घरक्रीडाTokyo Olympics : ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी नरेंद्र मोदींनी दिल्या जपानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

Tokyo Olympics : ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी नरेंद्र मोदींनी दिल्या जपानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

Subscribe

टोकियोत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असला, तरी आता प्रेक्षकांविना ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे.

टोकियोमध्ये होत असलेल्या यंदाच्या ऑलिम्पिकला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनात अनेक अडथळे आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि जपानी आयोजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मागील वर्षी होणारे हे ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले. टोकियोत कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असला, तरी आता प्रेक्षकांविना ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आज पार पडणार असून उद्यापासून मुख्य स्पर्धांना सुरुवात होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियोमध्ये होत ऑलिम्पिक, तसेच पॅरालिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्कृष्ट कामगिरी पाहण्यासाठी उत्सुक

पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि जपानला टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठी खूप शुभेच्छा. जगातील सर्वोत्तम खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले. ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार असून त्यानंतर २४ ऑगस्टपासून पॅरालिम्पिक स्पर्धांना सुरुवात होईल.

- Advertisement -

मोदींनी साधलेला खेळाडूंशी संवाद 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. भारताने यंदा आपले ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वात मोठे पथक टोकियोमध्ये पाठवले असून यात १२० खेळाडूंचा समावेश आहे. भारताचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला होता. ऑलिम्पिकमध्ये तुम्ही देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी कराल याची खात्री असल्याचे मोदी खेळाडूंना म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – टोकियो ऑलिम्पिक शुक्रवारपासून, कुठे आणि कसे पाहता येणार?


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -