Tokyo Olympics : महिला हॉकी संघाच्या विजयानंतर अश्रू अनावर झालेला खऱ्या आयुष्यातील ‘शाहरुख’ आहे तरी कोण?

भारतीय हॉकी संघाची ४ वर्षापुर्वी जबाबदारी कोच जोर्द मरीन यांनी सांभाळली सुरुवातीला त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

Tokyo Olympics India women's hockey team coach sjoerd marijne emotional on india team win he is real life kabir khan
Tokyo Olympics : महिला हॉकी संघाच्या विजयानंतर अश्रू अनावर झालेला खऱ्या आयुष्यातील 'शाहरुख' आहे तरी कोण?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज म्हणजेच सोमावारी महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलिया हॉकी संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. महिला हॉकी संघाच्या विजयानंतर संघाचा कोच जोर्द मरीन याला अश्रू अनावर झाल्याचा पाहयाल मिळाले आहे. चक दे इंडिया हिंदी चित्रपटात जसे अभिनेता शाहरुख खानला भारतीय संघ विजयी झाल्यावर अश्रू अनावर झाले होते तसेच कोच जोर्द मरीनही भावूक झाले आहेत. मात्र खऱ्या आयुष्यातील हा शाहरुख खाण आहे तरी कोण ते जाणून घ्या. ४ वर्षांपुर्वी जोर्द मरीन याने भारतीय संघाचा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

भारतीय हॉकी संघाची ४ वर्षापुर्वी जबाबदारी कोच जोर्द मरीन यांनी सांभाळली सुरुवातीला त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. संघातून काही खेळाडू सेवानिवृत्त झाले त्यावेळी नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देऊन पुन्हा संघाला उभं करण्याचे आव्हान कोच मरीन यांच्यावर होते. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाला जे यश प्राप्त झालं आहे त्याचं सर्व श्रेय मरीन यांना जाते. जोर्द मरीन यांनी या टीमला संभाळले आणि खेळाडूंची निवडही केली आहे.

संघाची विचारसरणी बदलली

जोर्द मरीन स्वतः १० वर्षांपर्यंत फील्ड हॉकी खेळले आहेत. मरीन यांनी महिला संघासोबत पुरुष संघालाही प्रशिक्षण दिले आहे. मरीनला २०१७ मध्ये महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले तेव्हा त्यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले. मरीन स्वतः चांगले वक्ते आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. लोकांमध्ये जोश निर्माण करणं त्यांना चांगले माहिती आहे परंतू कला आणि हुनर यासाठी त्यांनी एक योजना तयारी केली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे खेळाडूंचा विचार बदलण्याची गरज होती. जसं की, चक दे इंडिया चित्रपटातील कबीर खान सारखे मात्र आताच्या विजयानंतर जोर्द मरीन हेच खऱ्या आयुष्यातील कबीर खान आहेत असे बोलले जात आहे. मरीन यांना महिला हॉकी संघाच्या सामन्या दरम्यान भावूक झाले नव्हते मात्र संघाच्या विजयानंतर त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय हॉकी संघाची विचारसरणी बदलण्यामागे जोर्द मरीनची झलक स्पष्ट दिसत आहे. मरीन भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघाची कामगिरी अधिक सुधारली आहे. मागील ऑलिम्पिकमध्ये चॅम्पियन ग्रेट ब्रिटनला घरच्या मैदानावर हरवणे किंवा विश्वचषकात कांस्य पदक जिंकणाऱ्या स्पेनला टक्कर देणे तसेच भारतीय संघ आता आव्हानांना घाबरत नसून सामोरे जात आहे. जोर्द मरीन यांची झलक मागील ऑलिम्पिक क्लालिफिकेशनसाठी झालेल्या सामन्यांदरम्यानही दिसली आहे. पहिलं भारतीय टीमनं अमेरिनक मिडफिल्डला चांगले आव्हान दिले तर बचाव करताना चांगली कामगिरी दाखवली होती. मरीन यांना माहिती आहे की, भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

ऑलिम्पिकपुर्वी दिली होती प्रतिक्रिया

ऑलिम्पिक खेळ सुरु होण्यापुर्वी मरीन यांनी म्हटलं होते की दोन ते तीन वर्षांपुर्वी संघ हार स्वीकारुन घेत होती पण आता संघातील खेळाडू एकमेकांसोबत चर्चा करतात आणि परिस्थितीवर मात करत आहेत. याचे कारण त्यांचे विचारकरण्याची पद्धत बदलली आहे. संघाचे मानसिक आरोग्य सुधारल्यामुळे मरीन यांच्या नेतृत्वात संघाने उपांत्य फेरीत धडक दिली आहे असल्याचे मरीन यांनी म्हटलं आहे.

द्रोनाचार्य पुरस्कार देण्याची मागणी

नेटकऱ्यांनी महिला हॉकी संघाच्या विजयानंतर जोर्द मरीन यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. भारतीय संघाने मरीन यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारदेण्यात यावा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार प्रशिक्षकांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सरकारकडून देण्यात येतो.