Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत कोणतीही कमतरता ठेवली नाही!

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत कोणतीही कमतरता ठेवली नाही!

एक वर्षाच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आणि आता अत्यंत विलक्षण परिस्थितीत भरविण्यात येत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या सुमारे १२५ क्रीडापटूंनी, या स्पर्धेपूर्वी स्वतःला शारीरिक, मानसिक आणि स्पर्धात्मक पातळीवर सर्वोत्तम खेळाडू म्हणून घडविण्यासाठी तयारीत कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.

Related Story

- Advertisement -

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडापटूंची शेवटच्या टप्प्यातील तयारी अत्यंत जोमात सुरु असून त्या सर्वांमध्ये आत्मविश्वासाची एक लाट उसळलेली आहे हेच खरे. भारताच्या दर्जेदार क्रीडापटूंमध्ये स्वतःवरील दृढ विश्वास आणि स्पर्धेबद्दलची चिंतापूर्ण उत्सुकता यांचे एक उत्तम मिश्रण सध्या सर्वांना बघायला मिळत आहे. सर्वत्र महामारीची परिस्थिती असतानादेखील त्यांची स्पर्धेसाठीची तयारी आणि महामारीमुळे समोर ठाकलेल्या आव्हानांना तोंड देण्याची सज्जता यातून दिसून येत आहे. आत्मविश्वासाची ही आभा कुठून निर्माण झाली आहे हे जाणून घेणे फार कठीण नाही. एक वर्षाच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आणि आता अत्यंत विलक्षण परिस्थितीत भरविण्यात येत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या सुमारे १२५ क्रीडापटूंनी, या स्पर्धेपूर्वी स्वतःला शारीरिक, मानसिक आणि स्पर्धात्मक पातळीवर सर्वोत्तम खेळाडू म्हणून घडविण्यासाठी तयारीत कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.

या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पात्र ठरण्याची संधी मिळालेल्या आपल्या बॅडमिंटन खेळाडूंना हवा असलेला सर्व पाठिंबा मिळत आहे असे म्हणणे योग्य ठरेल. प्रत्येक पात्र क्रीडापटूला परदेशी प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट आणि शारीरिक सामर्थ्य, तसेच मनोबल यात मदत करणारे प्रशिक्षक यांची मदत पुरविली जात आहे. जेव्हा स्पर्धकांना अशा प्रकारे व्यक्तिगत लक्ष पुरविणार्‍या सुविधा मिळत नव्हत्या अशा काळापासून आता आपण खूप पुढे निघून आलो आहोत. अनेक प्रमुख देश अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याची इच्छा बाळगून असतात.

- Advertisement -

अशा वेळी माझ्या मनात २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेची आठवण जागी होते. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांना इच्छित परिणाम साधता आला नव्हता, तरीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पथकाला १०० टक्के कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. रिओ स्पर्धांच्या तयारीसाठी त्यांनी स्थापन केलेल्या ऑलिम्पिक कृती दलात मी सहभागी होतो. त्यावेळी देशातील सर्वोच्च पातळीपासून ते अगदी तळापर्यंत क्रीडा क्षेत्राबद्दल सकारात्मक आणि अधिक व्यावसायिक वातावरण निर्माण करण्यासाठी भारतीय क्रीडाक्षेत्रात जे बदल घडविण्यात येत होते ते मी पाहू शकलो आहे.

यातील एक उल्लेखनीय बदल म्हणजे भारताने, ‘क्रीडापटूंना प्राधान्य’ देण्याची भूमिका घेतली आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून क्रीडापटूंच्या सर्व गरजा पुरविल्या जातील हे सुनिश्चीत केले. सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवासाठी क्रीडापटूंना व्यवस्थित तयारी करता यावी यासाठी एकचित्ताने त्यांना मदत पुरविण्याचे कारण आणि त्याची तातडी याचे महत्त्व प्रत्येकाला समजावण्यात यश आल्याने थोड्याच कालावधीत परिस्थितीत मोठे परिवर्तन दिसून आले.

- Advertisement -

राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्याशी उत्तम समन्वय साधत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने प्रशिक्षकांच्या कराराची मुदत वाढविली जाईल याची खात्री करून घेतली. यामुळे देशभरात अव्वल दर्जाच्या केंद्रांमध्ये अत्यंत विश्वसनीय आणि सुरक्षित पद्धतीने राष्ट्रीय शिबिरे पुन्हा सुरु करण्यात आली.
या सर्व प्रयत्नांची फलनिष्पत्ती टोकियो २०२० स्पर्धांमध्ये बघायला मिळेल अशी मला आशा आहे आणि तशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

आपल्या क्रीडापटूंमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा आपणा सर्वांसाठी निर्णायक टप्पा ठरु शकेल. त्याचा सकारात्मक फायदा होऊन भारताला आणि देशातील क्रीडाविश्वाला अधिक उंचीवर नेण्यासाठी त्यामुळे चालना मिळेल. कोविड-१९ महामारीच्या काळात लोकांना निराश वातावरणातून बाहेर काढून त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आपल्याला मिळालेली ही खरोखरीच उत्तम संधी आहे.

(हा लेख भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी लिहिलेला आहे)

- Advertisement -