घरक्रीडाOlympics : जपानने प्रवासावर घातलेले निर्बंध भारतीय खेळाडूंना लागू नाहीत; आयओएच्या अध्यक्षांनी केले...

Olympics : जपानने प्रवासावर घातलेले निर्बंध भारतीय खेळाडूंना लागू नाहीत; आयओएच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट 

Subscribe

खेळाडूंनी चिंता करण्याचे कारण नाही, असे बात्रा म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जपान सरकारने भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांच्या नागरिकांवर प्रवासाचे निर्बंध घातले आहेत. शुक्रवारपासून हे निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधांमुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंना टोकियोमध्ये प्रवेश मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु, जपानने प्रवासावर घातलेल्या निर्बंधांचा भारतीय खेळाडूंवर परिणाम होणार नाही, असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी व्यक्त केला आहे. भारतीय पथकाने चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाग घेण्यापासून अडवू शकत नाही

भारत, पाकिस्तान व नेपाळ या देशांचे सामान्य नागरिक आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू यांच्यात मोठा फरक आहे. ऑलिम्पिकचे आयोजक या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांना काही गोष्टींची हमी देतात. ऑलिम्पिकचे आयोजन करणारा देश किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) कोणत्याही देशाच्या पात्र खेळाडूला या स्पर्धेत भाग घेण्यापासून अडवू शकत नाही. खेळाडू आणि अधिकारी अशा एकूण २१० व्यक्तींच्या पथकाला ऑलिम्पिक होत असलेल्या देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळालेली असते. त्यामुळे खेळाडूंनी चिंता करण्याचे कारण नाही, असे बात्रा म्हणाले.

- Advertisement -

लसीकरणाचे सर्व नियम पाळले

तसेच खेळाडू सर्व नियमांचे पालन करतील. खेळाडूंचे लसीकरण झालेले असेल. अधिकाऱ्यांनाही लस देण्यात आली असून काहींनी कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. त्यामुळे आम्ही लसीकरणाचे सर्व नियम पाळले असून टोकियोसाठी रवाना होण्याआधी २४ तास खेळाडूंची कोरोना चाचणीही केली जाईल. त्यामुळे सर्व पात्र खेळाडूंना, तसेच अधिकाऱ्यांना टोकियोमध्ये प्रवेश मिळेल, असेही बात्रा यांनी सांगितले.


टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी याचिका; साडे तीन लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -