Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Tokyo Olympics : टेनिसपटू सुमित नागल ऑलिम्पिकसाठी पात्र; दुहेरीत बोपण्णासोबत खेळणार

Tokyo Olympics : टेनिसपटू सुमित नागल ऑलिम्पिकसाठी पात्र; दुहेरीत बोपण्णासोबत खेळणार

२३ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुमित पुरुष एकेरी आणि दुहेरी या दोन्ही गटांमध्ये खेळणार आहे.

Related Story

- Advertisement -

भारताचा टेनिसपटू सुमित नागल टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. बऱ्याच पुरुष टेनिसपटूंनी विविध कारणास्तव ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतल्याचा फायदा सुमितला झाला आहे. तसेच सुमित ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) दिवीज शरणचे नामांकन मागे घेतले आहे. त्यामुळे पुरुष दुहेरीत आता शरणऐवजी सुमित नागल अनुभवी रोहन बोपण्णाच्या साथीने खेळेल. २३ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुमित पुरुष एकेरी आणि दुहेरी या दोन्ही गटांमध्ये खेळणार आहे.

सुमित जागतिक क्रमवारीत १४४ व्या स्थानी

टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या पात्रतेचा कालावधी संपायला काही तास शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने एआयटीएशी संपर्क साधून सुमित ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याचे त्यांना सांगितले. १४ जून रोजीच्या क्रमवारीनुसार टेनिसपटूंना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यावेळी सुमित जागतिक क्रमवारीत १४४ व्या स्थानी होता.

- Advertisement -

गुरुवारी कटऑफची संख्या ही १३० पर्यंत आली होती. त्यामुळे क्रमवारीत १२७ व्या स्थानी असलेला भारताचा युकी भाम्बरी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. परंतु, उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याने ऑलिम्पिकमधून माघार घेतली.

- Advertisement -