Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी दहियाचे पदक पक्के; अंतिम फेरीत मारली धडक 

ऑलिम्पिक स्पर्धांत पदक जिंकणारा रवी दहिया हा भारताचा पाचवा कुस्तीपटू ठरला आहे.

indian wrestler Ravi Kumar Dahiya
कुस्तीपटू रवी दहियाचे पदक पक्के; अंतिम फेरीत मारली धडक 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बुधवारचा दिवस भारताच्या कुस्तीपटूंनी गाजवला आहे. ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कझाकस्तानच्या नुरीस्लाम सानायेव्हचा पराभव केला. या विजयासह त्याने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारली असून त्याचे पदक निश्चित झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणारा दहिया हा खाशाबा जाधव, सुशील कुमार (२ पदके), योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांच्यानंतरचा पाचवा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. उपांत्य फेरीतील सामना संपायला एका मिनिटाहूनही कमी वेळ शिल्लक असताना दहियाने सानायेव्हला लोळवले आणि सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.