Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : लोव्हलिना 'अशाप्रकारे' करणार कांस्यपदकाचा आनंद साजरा!

Tokyo Olympics : लोव्हलिना ‘अशाप्रकारे’ करणार कांस्यपदकाचा आनंद साजरा!

उपांत्य फेरीतील पराभवानंतर लोव्हलिनाला कांस्यपदक मिळणार हे निश्चित झाले आहे.

Related Story

- Advertisement -

भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यश आले. लोव्हलिनाला बुधवारी झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत विश्वविजेत्या बुसेनाझ सुरमेनेलिने ०-५ असे पराभूत केले. त्यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. परंतु, उपांत्य फेरीतील पराभवानंतर लोव्हलिनाला कांस्यपदक मिळणार हे निश्चित झाले आहे. याबाबत ती फार खुश नाही. असे असले तरी ती मागील आठ वर्षांत घेतलेल्या मेहनतीसाठी आणि कांस्यपदक जिंकल्याबद्दल आनंद साजरा करणार आहे. ती २०१२ नंतर पहिल्यांदाच सुट्टी घेणार आहे.

सुट्टी घेणार हे नक्की

ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे माझे स्वप्न होते. पदक जिंकण्यात यश आल्याचे मला समाधान आहे, पण मी आणखी चांगली कामगिरी करू शकले असते. मागील आठ वर्षांत घेतलेल्या मेहनतीमुळे मला पदक मिळवता आले. मी घरापासून, कुटुंबियांपासून दूर राहिले. माझ्या आवडीच्या पदार्थही खाते आले नाहीत. मात्र, आता मी एक महिना किंवा त्याहून अधिक काळ सुट्टी घेणार आहे. बॉक्सिंग करण्यास सुरुवात केल्यापासून मी एकही सुट्टी घेतलेली नाही. आता कुठे जायचे हे माझे ठरलेले नाही, पण मी सुट्टी घेणार हे नक्की, असे लोव्हलिनाने सांगितले.

योजनेनुसार खेळ करता आला नाही

- Advertisement -

लोव्हलिनाने कांस्यपदक जिंकले असले तरी उपांत्य फेरीत सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आल्याचे तिला दुःख होते. मला वाईट वाटत आहे. मी सुवर्णपदक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मला योजनेनुसार खेळ करता आला नाही. मी बॅकफूटवर राहिले, तर प्रतिस्पर्धी खेळाडू माझ्यावर हल्ला करेल असे मला वाटले. त्यामुळे मी आक्रमक शैलीत खेळ केला. परंतु, त्याचा अपेक्षित फायदा झाला नाही. तिने (बुसेनाझ) सातत्याने आक्रमकता दाखवली आणि मी तिला रोखण्यात कमी पडले, असे उपांत्य फेरीतील पराभवानंतर लोव्हलिना म्हणाली.

- Advertisement -