Tokyo Olympics : मेरी कोम, मनप्रीत सिंगची भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड

स्तीपटू बजरंग पुनिया ८ ऑगस्टला होणाऱ्या सांगता सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल.

tokyo olympics Mary Kom and Manpreet Singh named as India's Flag Bearers At Opening Ceremony
मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांची भारतीय ऑलिम्पिक पथकाचे ध्वजवाहक म्हणून निवड

सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांची भारतीय ऑलिम्पिक पथकाचे ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २३ जुलै रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात मेरी आणि मनप्रीत हे भारतीय पथकाचे धवजवाहक असतील, अशी घोषणा भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (IOA) सोमवारी करण्यात आली. तसेच जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया ८ ऑगस्टला होणाऱ्या सांगता सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल.

भारतीय पथकात २०१ जणांचा समावेश 

भारतीय पथकात १२६ खेळाडू आणि ७५ प्रशिक्षक व अन्य अधिकारी अशा एकूण २०१ जणांचा समावेश असणार आहे. तसेच भारतीय पथकातील १२६ खेळाडूंपैकी ५६ टक्के खेळाडू हे पुरुष असून ४४ टक्के महिला खेळाडू आहेत, अशी माहिती आयओएकडून देण्यात आली. भारताची महान बॉक्सर मेरी कोमचे हे अखेरचे ऑलिम्पिक असेल. तिला याआधी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यश आले होते. यंदा ती सुवर्णपदक जिंकण्यास उत्सुक आहे. तर भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत आपल्या तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणार आहे. याआधी त्याने २०१२ लंडन आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.