Tokyo Olympics: ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूला Dominos देणार लाईफटाइम फ्री पिझ्झा

पदक जिंकल्यानंर पहिल्यांदा तु काय करणार असा प्रश्न मीराबाईला मुलाखतीत विचारण्यात आला, पदक जिंकल्यानंतर मला पहिल्यांदा पिझ्झा खायचा आहे, असे मजेशीर उत्तर मीराबाईने दिले होते. त्यानंतर मीराबाईची दखल घेत तिची पिझ्झा खाण्याची इच्छा डोमिनोजने पूर्ण केलीय. डोमिनोजने ट्विट करत मीराबाई चानूला लाईफटाइम पिझ्झा फ्री देण्याची घोषणा केली.

Tokyo Olympics: Olympic medalist Mirabai Chanu to get Dominos Lifetime Free Pizza
Tokyo Olympics: ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूला Dominos देणार लाइफटाइम फ्री पिझ्झा

टोकियो ऑलिम्पिक सुरु होताच पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Meerabai chanu)  भारताला रौप्य पदक कमावून दिले. ४९ किलो वजनी गटात मिराबाई चानूला रौप्य पदक मिळाले. मिराबाईची जबरदस्त कामगिरी भारतासाठी खूप महत्त्वाची आणि अभिमानास्पद होती. विविध स्तरातून, जगभरातून मीराबाई चानूचे कौतुक करण्यात येत असताना मीराबाईला आखणी सुखद धक्का देण्यात आलाय. मीराबाई चानूला Dominose कडून लाईफटाइम फ्री पिझ्झा देण्याची घोषणा डोमिनोजकडून करण्यात आलीय. (Tokyo Olympics: Olympic medalist Mirabai Chanu to get Dominos Lifetime Free Pizza)  रौप्य पदक मिळण्याआधी मीराबाई चानूने एका वृत्तवाहिला एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतातीत मीराबाईला एक प्रश्न विचारण्यात आला ज्याचे तिने मजेशीर उत्तर दिले होते. पदक जिंकल्यानंर पहिल्यांदा तु काय करणार असा प्रश्न मीराबाईला विचारण्यात आला, पदक जिंकल्यानंतर मला पहिल्यांदा पिझ्झा खायचा आहे, असे मजेशीर उत्तर मीराबाईने दिले होते. त्यानंतर आता पदक जिंकल्यानंतर मीराबाईची दखल घेत तिची पिझ्झा खाण्याची इच्छा डोमिनोजने पूर्ण केलीय. डोमिनोजने ट्विट करत मीराबाई चानूला लाईफटाइम पिझ्झा फ्री देण्याची घोषणा केली.

 

‘मीराबाईने सांगितले आणि आम्ही ते ऐकले. मीराबाईला पिझ्झा खाण्यासाठी आता अजिबात वाट पाहण्याची गरज नाही, मीराबाई चानूला डोमिनोझकडून लाईफटाइम पिझ्झा फ्री देण्यात येईल, असे ट्विट डोमिनो इंडियाकडून करण्यात आलेय. इतकच नाही तर मीराबाईच्या घरी देखील डोमिनोजने पिझ्झाची डिलिव्हरी केली आहे.

 

मीराबाईच्या या भरगोस यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मीराबाईचे अभिनंदन करत तिला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तर मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन यांनी मीराबाईला व्हिडिओ कॉलवरुन शुभेच्छा दिल्या. तसेच बीरेन सिंग यांनी मीराबाईला १ कोटी रुपये आणि विशेष सरकारी पोस्ट देण्याची घोषणा केली.

तब्बल २१ वर्षांनंतर भारताने टोकियो ऑल्मिपिकमध्ये आपले खाते उघडले आहे. शनिवारी झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो वजन तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो वजन असे एकूण २०२ किलो वजन उचलून भारताला रोप्यपदक मिळवून दिले. ‘ऑल्मिपिक पदक जिंकल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले. माझे पदक मी माझ्या देशाला समर्पित करते’, अशा भावना मीराबाईने व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे तिने सर्व भारतीयांचे तिने आभार मानले. विशेष: म्हणजे तिच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या आईचे देखील आभार मानले.


हेही वाचा – Mirabai Chanu : अपयशानंतरचे यश!