Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Tokyo Olympics : ऑलिम्पिकवरील कोरोनाचे सावट कायम; एक खेळाडू, पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

Tokyo Olympics : ऑलिम्पिकवरील कोरोनाचे सावट कायम; एक खेळाडू, पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

दिवसेंदिवस आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीपुढील आव्हाने वाढताना दिसत आहेत.

Related Story

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकला आता केवळ एका आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. हे ऑलिम्पिक यशवीरित्या पार पडेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बॅच यांनी व्यक्त केला होता. मात्र, या ऑलिम्पिकपुढील आव्हाने संपताना दिसत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मागील वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक एका वर्षाने पुढे ढकलावे लागले होते. परंतु, यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेवर कोरोनाचे सावट कायम आहे. जपानमधील एका खेळाडूला, तसेच पाच ऑलिम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. टोकियो २०२० च्या आयोजकांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली.

बुधवारी काहींना झालेली कोरोनाची बाधा

बुधवारी टोकियोतील हामामात्सू सिटी येथील एका हॉटेलमधील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. या हॉटेलमध्ये ३१ जणांचा समावेश असलेले ब्राझीलचे पथक वास्तव्यास आहे. ब्राझीलचे हे पथक या हॉटेलात बायो-बबलमध्ये असून त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच रशिया रग्बी संघाच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आव्हाने वाढताना दिसत आहेत

- Advertisement -

त्यापाठोपाठ गुरुवारी आणखी एक खेळाडू आणि पाच ऑलिम्पिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. पाच कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक जण हे कंत्राटदार आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीपुढील आव्हाने वाढताना दिसत आहेत. परंतु, एक दिलासादायक बाब म्हणजे १ जुलैपासून जपानमध्ये दाखल झालेल्या ८ हजार जणांपैकी केवळ काहींनाच कोरोनाची बाधा झाली आहे.

- Advertisement -