घरक्रीडाOlympics : टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी याचिका; साडे तीन लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या

Olympics : टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी याचिका; साडे तीन लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या

Subscribe

ऑलिम्पिक स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

जपानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे जपान सरकार टोकियो आणि इतर काही भागांमध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत आणीबाणी घोषित होणे अपेक्षित आहे. टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात होण्याआधी १० आठवडे ही परिस्थिती असल्याने या स्पर्धेच्या आयोजनाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. ऑलिम्पिक रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर साडे तीन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती आहे. ऑलिम्पिक स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

जपानमधील आरोग्य यंत्रणेवर ताण

होकायडो येथे ऑलिम्पिक मॅरेथॉन होणार असून या शहरातही आणीबाणी घोषित होऊ शकेल. कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे जपानमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जपानमधील आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आला आहे. यंदा टोकियो ऑलिम्पिक झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल अशी भीती स्थानिक नागरिकांना आहे. याच पार्श्वभूमीवर, साडे तीन लाखांहून अधिक नागरिकांनी ऑलिम्पिक रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

- Advertisement -

ऑलिम्पिकचे सुरक्षित आयोजन अशक्य

ही याचिका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC), आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती (IPC) आणि जपान सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. ऑलिम्पिक झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढेल. तसेच सध्याच्या महामारीत ऑलिम्पिक स्पर्धा सुरक्षितरित्या आयोजित करणे अशक्य असल्याचे गुरुवारी डॉक्टरांच्या युनियनने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -