Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : सुमित नागलाची विक्रमी कामगिरी; डेनिस इस्टोमिनला केले पराभूत

Tokyo Olympics : सुमित नागलाची विक्रमी कामगिरी; डेनिस इस्टोमिनला केले पराभूत

ऑलिम्पिकच्या टेनिस एकेरीत सामना जिंकणारा तो २५ वर्षांतील पहिला भारतीय खेळाडू ठरला.

Related Story

- Advertisement -

भारताचा टेनिसपटू सुमित नागलने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची विजयी सुरुवात केली. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत त्याने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनला ६-४, ६-७, ६-४ असे पराभूत केले. नागलची ही कामगिरी खास ठरली. ऑलिम्पिकच्या टेनिस एकेरीत सामना जिंकणारा तो २५ वर्षांतील पहिला भारतीय खेळाडू ठरला. १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेसने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भारताच्या एकाही टेनिसपटूला एकेरीतील सामना जिंकता आला नव्हता.

पहिल्या फेरीच्या सामन्यात नागलने इस्टोमिनला ६-४, ६-७, ६-४ असे पराभूत केले. या सामन्याचा पहिला सेट नागलने ६-४ असा जिंकल्यावर इस्टोमिनने दमदार पुनरागमन केले. त्याने दुसरा सेट टाय-ब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकत सामन्यात बरोबरीत केली. परंतु, तिसऱ्या सेटमध्ये सुमितने पुन्हा उत्कृष्ट खेळ करत हा सेट ६-४ असा जिंकत सामनाही जिंकला. आता दुसऱ्या फेरीत सुमितपुढे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचे आव्हान असेल.

बात्रा, मुखर्जी दुसऱ्या फेरीत 

- Advertisement -

भारताच्या टेबल टेनिसपटू मनिका बात्रा आणि सुतिर्था मुखर्जी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीच्या सामन्यात बात्राने ब्रिटनच्या टिन-टिन होचा ४-० असा, तर मुखर्जीने स्वीडनच्या लिंडा बर्गस्ट्रॉमचा ४-३ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र बात्रा आणि शरथ कमल यांना मात्र पराभव पत्करावा लागला.

- Advertisement -