घरक्रीडाTokyo 2020 Paralympics : भाविना पटेलनं टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला जिंकून दिलं पहिलं...

Tokyo 2020 Paralympics : भाविना पटेलनं टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला जिंकून दिलं पहिलं पदक, रौप्यपदकावर कोरलं नाव

Subscribe

Tokyo 2020 Paralympics : टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक जिंकून देत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त भाविनामुळे भारताला एक नवे पदक मिळाले आहे. भाविनाबेन पटेलने पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत भारताचे रौप्य पदकावर नाव कोरले आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले वहिले पदक आहे. भाविनाचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र अंतिम सामन्यात चीनच्या यिंगनंने तिचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यिंगने विजेते पदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० ने पराभव केला. परंतु टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी भाविना ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. रौप्यपदकापर्यंत गवसणी घालणाऱ्या भाविनाबेनने साऱ्या भारतीयांची मने जिंकली आहेत.

१९ मिनिटे रंगलेल्या सामन्यात भाविना पटेलने चीनच्या वर्ल्ड नंबर वन यिंगची फाईच केली. पण यिंगने सलग सत्रात भाविनाचा पराभव केला. यिंगन पहिल्या सत्रापासूनचं भविावावर दबाव निर्माण करण्याची तयार केली होती. यावेळी यिंगने पहिल्या सत्रात ११-७ अशा फरकाने पहिला आपल्या बाजूने जिंकन घेतला. तर दुसऱ्या सत्रातही यिंगने दमदार प्रदर्शन केले. दुसऱ्या सत्रात तिने भाविनाबेनचा ११-५ अशा फरकारने पराभव केला. मात्र दुसऱ्या सत्रापासून भाविना सामना आपल्या बाजूने जिंकवण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु यिंगने तिसऱ्या सत्रात ११- ६ अशा फरकाने सुवर्ण पद आपल्या नावे केले.

- Advertisement -

१०० कोटी वसुली प्रकरण : अनिल देशमुखांना CBI कडून क्लिनचिट?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -