Paralympics 2020: नेमबाजीत मनिष नरवालची ‘सुवर्ण’ तर सिंहराजची ‘रौप्य’ पदकाला गवसणी

Tokyo Paralympics 2020 manish narwal and singhraj adhana wins gold and silver medal shooting
Paralympics 2020: नेमबाजीत मनिष नरवालची 'सुवर्ण' तर सिंहराजची 'रौप्य' पदकाला गवसणी

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आज दोन पदकांना गवसणी घालत सुवर्ण कामगिरी केली आहे. ५० मीटर एअर पिस्टल SH1 या क्रिडात भारताच्या मनिष नरवाल याने सुवर्ण तर सिंहराज अधाना याने दुसऱ्या क्रमांकावर राहत रौप्य पदकाची कमाई केली आहे. नेमबाजीतील या दोन पदकांमुळे भारताने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत आत्तापर्यंत १५ पदके आपल्या नावे केली आहेत.

१९ वर्षीय मनिष नरवालने पॅरालिम्पिक स्पर्धेत यंदा २१८. २ गुणांसह नवा रेकॉर्ड करत सुवर्ण पदाकाला गवसणी घातली. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे. तर सिंहराज अधाना यानेही २१६.७ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. मनिष नरवाल याने स्पर्धेची सुरुवातच धमाकेदार केली. मात्र स्पर्धा सुरु होताच एक वेळ अशी आली की तो सहाव्या क्रमांकावर येऊन पोहचला. मात्र त्याने पुन्हा दमदार पुनरागमन करत स्पर्धेतील घोडदौड सुरुच ठेवली आणि सुवर्ण पद आपल्या खिश्यात घातले. याचवेळी ३९ वर्षीय सिंघराज स्पर्धेच्या सुरुवातीपासूनचं टॉप-३ मध्ये कायम टिकून होता.

जपानची राजधानी टोकियोमध्ये सुरु असलेल्या या पॅरालिम्पिक स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडूंची चमकदार आणि कौतुकास्पद अशी कामगिरी होताना दिसतेय. आत्तापर्य़ंतच्या इतिहासात भारताने यंदा सर्वाधिक पदकांची नोंद केलीय. भारताकडे आता ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्यपदके आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रिओ पॅरालिम्पिक (२०१६) मध्ये भारताने २ सुवर्णांसह ४ पदके जिंकली.


खडसेंच्या अडचणीत वाढ, ED ने दाखल केले आरोपपत्र, कुटुंबियांचाही समावेश