Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Paralympicsमध्ये कृष्णा नागरची बॅडमिंटनमध्ये 'सुवर्ण' कामगिरी

Tokyo Paralympicsमध्ये कृष्णा नागरची बॅडमिंटनमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी

भारताच्या खात्यातील पदकांची संख्या आता १९ वर पोहचली आहे.

Related Story

- Advertisement -

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics ) भारताच्या कृष्णा नागरने (Krishna Nagar) इतिहास रचत भारताला पाचवे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. कृष्णा नागरने रविवारी बॅडमिंटनमध्ये (badminton)  पुरुष एकल एसएच-६ स्पर्धेत फायनलमध्ये हॉगकॉंगच्या चू मन काईचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले आहे. (Tokyo Paralympics Krishna Nagar wins gold medal in badminton ) प्रमोद भगतने (Pramod Bhagat) शनिवारी एसएल ३ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजतेपज पटकावले आणि त्यानंतर आता टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्ण पदक आहे. टोकियो पॅरोलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरला सुर्वण पदक तर सुहास यथीराजला (Suhas Yathiraj) रौप्य पदक मिळवले आहे. यासोबतच भारताने १९ पदकांची कमाई करत क्रिडाविश्वात वेगळी मोहोर उमटवली आहे.


स्पर्धेत कृष्णा नागरचने सर्वोत्तम कामगिरी केली आणि २१-१७, १६-२१ आणि २१-१७ असा सामना खेळत मॅच जिंकली. एकूण ४३ मिनिटे हा मुकाबला सुरू होता. कृष्णाने सेमीफायनलमध्ये ब्रिटेनच्या क्रिस्टनचा पराभव करत फायनलमध्ये आपली जागा मिळवली. पहिल्या गेममध्ये कृष्णाचा प्रतिस्पर्धी पुढे होता मात्र दुसऱ्या गेममध्ये हॉगकाँच्या चू मन काईची बरोबरी करत कृष्णाने गेम जिंकला. कृष्णाने शेवटपर्यंत हार न मानता तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये सुवर्ण पदक पटकावले.

- Advertisement -

कृष्णा नागरने गेमच्या सुरुवातीला काही चुका केल्या आणि काईने १६-११ अशी आघाडी केली. मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंचे पुनरागमन केले आणि एक गुण मागे राहून १५-१६ असा स्कोर केला. त्यानंतर गेममध्ये आणखी एक गुण मिळवून १५-१७ ने नागरे प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले. नागरने पहिला गेम २१-१७ असा स्कोर करत जिंकला.

- Advertisement -

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यातील पदकांची संख्या आता १९ वर पोहचली आहे. कृष्णा नागर याने भारताला पाचवे सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. भारताच्या खात्यात आता ५ सुवर्ण पदके, ८ रौप्य पदके आणि ६ कांस्य पदके आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.


हेही वाचा – Tokyo Paralympics: नोएडाच्या सुहास यथिराजने बॅटमिंटनमध्ये पटकावले सिल्वर मेडल

- Advertisement -