घरक्रीडाEPL : टॉटनहॅमची आर्सनलवर मात

EPL : टॉटनहॅमची आर्सनलवर मात

Subscribe

टॉटनहॅमने यंदाच्या मोसमात दमदार खेळ केला असून हा त्यांचा ११ सामन्यांत सातवा विजय ठरला.

हॅरी केन आणि सॉन ह्युंग मिन यांनी केलेल्या गोलच्या जोरावर टॉटनहॅमने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात आर्सनलवर २-० अशी मात केली. टॉटनहॅमने यंदाच्या मोसमात दमदार खेळ केला असून हा त्यांचा ११ सामन्यांत सातवा विजय ठरला. टॉटनहॅम मोसमाची पराभवाने सुरुवात केली होती, पण त्यानंतर हा संघ अपराजित आहे. त्यामुळे २४ गुणांसह टॉटनहॅमचा संघ प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे.

या सामन्यात आर्सनलने अधिक आक्रमक खेळ केला. तसेच त्यांना अधिक वेळ चेंडूवर ताबा मिळवण्यातही यश आले. मात्र, त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. टॉटनहॅमने या सामन्यात प्रतिहल्ला करण्यावर भर दिला आणि याचा फायदा त्यांना १३ व्या मिनिटाला मिळाला. हॅरी केनच्या पासवर सॉनने गोल करत टॉटनहॅमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतराआधी सॉनच्या पासवर केनने गोल केल्याने टॉटनहॅमची आघाडी दुप्पट झाली. यानंतरही टॉटनहॅमचा भक्कम बचाव आर्सनलला भेदता आला नाही. त्यामुळे टॉटनहॅमने हा सामना २-० असा जिंकला.

- Advertisement -

दुसरीकडे लिव्हरपूलने वोल्व्हसचा ४-० असा पराभव केला. लिव्हरपूलकडून मोहम्मद सलाह, जिनी वाईनआल्डम, जोएल मातीप आणि नेल्सन सोमेडो (स्वयं गोल) यांनी गोल केला. तसेच ऑलिव्हिएर जिरूड, कर्ट झुमा आणि क्रिस्टियन पुलिसीच यांनी केलेल्या गोलमुळे चेल्सीने लीड्सवर ३-१ अशी मात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -