Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Toyko Olympics: मेरी कोमचा विजयी पंच, पहिली मॅच जिंकत अंतिम १६...

Toyko Olympics: मेरी कोमचा विजयी पंच, पहिली मॅच जिंकत अंतिम १६ मध्ये प्रवेश

स्पर्धेचा पुढील सामना हा २९ जुलै रोजी

Related Story

- Advertisement -

टोकियो ऑल्मिपिक भारताचे अनुभवी खेळाडू गाजवताना दिसत आहेत. भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम (Mary Kom)  हीने अपक्षेप्रमाणे स्पर्धेच्या सुरुवातीला आपला विजयी पंच केला आहे. (Toyko Olympics: boxer Mary Kom wins first match defeat hernandez and enters final 16)  पहिली मॅच जिंकत मेरी कॉमने अंतिम १६मध्ये प्रवेश मिळावला आहे. मेरी कॉमकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना ती पात्र असल्याचे तिने पहिली मॅच खेळून  ती जिंकून दाखवून दिले आहे. मेरी कोमने डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेजचा ४-१ने परभव करत अंतिम १६ मध्ये प्रवेश मिळवला. या स्पर्धेचा पुढील सामना हा २९ जुलै रोजी होणार असून कोलंबियाच्या तिसऱ्या नामांकित अशा वालेंसिया विक्टोरियाशी तिचा सामना होणार आहे.

- Advertisement -

मेरी कॉम टोकियो ऑल्मिपिक स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाची ध्वजवाहक होती. मेरी कोमची यंदाची शेवटची ऑल्मिपिक स्पर्धा असणार आहे. याआधी तिने लंडन ऑल्मिपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. मेरी कोम मार्च २०२०मध्ये आशिया विरुद्ध क्वालिफायरच्या उपांत्य फेरीत पोहचली होती. त्यानंतर तिला टोकियो ऑल्मिपिकचे तिकिट मिळाले.

- Advertisement -

रविवारचा दिवस टोकियो ऑल्मिपिकमध्ये भारतीय खेळाडू गाजवताना दिसत आहेत. सकाळी रिओ ऑल्मिपिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुने सिल्व्हर मेडल मिळवले. सिंधूकडून यंदा देशाला गोल्ड मेडलची अपेक्षा आहे.


हेही वाचा – Tokyo Olympics : ‘भारतीय नारी सब पे भारी’! रौप्यपदक विजेत्या मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव

- Advertisement -