Eco friendly bappa Competition
घर क्रीडा WTC Final 2023 : ट्रेव्हिस हेडची ऐतिहासिक कामगिरी, शतक ठोकत टीम इंडियाचं...

WTC Final 2023 : ट्रेव्हिस हेडची ऐतिहासिक कामगिरी, शतक ठोकत टीम इंडियाचं वाढवलं टेन्शन

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final)चा अंतिम सामना पार पडत आहे. हा सामना लंडनच्या ओव्हन मैदानावर होत आहे. यावेळी भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सध्याची स्थिती पाहता ८४ ओव्हर्स पूर्ण झाल्या असून ऑस्ट्रेलियाने ३२० धावा पूर्ण केल्या आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक खेळी केली आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी ट्रेव्हिस हेडने शतक ठोकत भारतीय संघांचं टेन्शन वाढवलं आहे.

ट्रेव्हिस हेडचं कसोटीतील हे सहावं शतक ठरलं आहे. तसेच ट्रेव्हिस ऑस्ट्रेलियाकडून आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम इतिहासात शतक ठोकणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. ट्रेव्हिसच्या खणखणीत खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती एकदम भक्कम झाली आहे. त्याला शतकासाठी एका धावाची आवश्यकता होती. परंतु त्याने आपल्या युक्तीचा वापर करत ६५ व्या ओव्हरमध्ये एक धाव घेत आपलं शतक पूर्ण केलं.

- Advertisement -

ट्रेव्हिस आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनी २९५ चेंडूत २०० धावांची भागादारी केली. ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेन याच्या रुपात २४.१ ओव्हरमध्ये ७६ धावांवर तिसरी विकेट गमावली होती. मात्र त्यानंतर ट्रेव्हिस आणि स्टीव्ह या जोडीने कमाल केली. स्मिथने २२७ चेंडूत ९५ धावा केल्या आहेत. तर ट्रेव्हिसने १५६ चेंडूत १४६ धावा ठोकल्या आहेत. भारतीय संघाला कमबॅक करण्यासाठी ही जोडी फोडणं आवश्यक आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही टीम

- Advertisement -

टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू – सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

ऑस्ट्रेलिया संघ – पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू – मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.


हेही वाचा : WTC Final: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार अंतिम सामना, लंडनच्या हवामानाची स्थिती काय


 

- Advertisment -