अहमदाबाद : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मात्र या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माबाबत केलेले विधान चर्चेचा ठरत आहे. (Travis Head statement about Rohit Sharma in discussion What did he say after winning the match ind vs aus WC 2023 Final)
ट्रॅव्हिस हेडने 2023 च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध स्फोटक फलंदाजी केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला सहाव्यांदा विजेतेपद मिळाले. त्याच्या कामगिरीमुळे ट्रॅव्हिस हेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्विकारताना ट्रॅव्हिस हेड म्हणाला की, पॅट कमिन्सचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अगदी योग्य होता. आजचा दिवस माझ्यासाठी अद्भूत आहे. आज संघाचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. घरी बसून विश्वचषक पाहण्यापेक्षा मैदानावर खेळणे कधीही चांगले. मी सुरुवातीला थोडा घाबरलो होतो, पण मार्नस लॅबुशेनने खूप चांगला खेळ केला. त्यामुळे माझ्यावरील दडपण निघून गेले. मला वाटते की, मार्नसने ज्या पद्धतीने खेळ चालवला त्यामुळे आमच्या विजय निश्चित झाला आणि हीच ऊर्जा आम्हाला हवी होती.
हेही वाचा – WC 2023 Final: भारताच्या पराभवावर बाबर आझमचं वक्तव्य चर्चेत; भारतीय चाहत्यांचा संताप
रोहितबद्दल हेड काय म्हणाला?
कर्णधार रोहित शर्माचा 47 धावांवर अफलातून झेल टिपत ट्रॅव्हिस हेडने त्याला माघारी पाठवले. याबाबत विचारले असता तो म्हणाला की, रोहित शर्मा आज कदाचित जगातला सर्वात दुर्दैवी व्यक्ती असेल. कारण मी माझ्या क्षेत्ररक्षणावर खूप काम केलं आहे. मला आजच्या सामन्यात जशी शतक झळकावेन याची कल्पना नव्हती, तशीच रोहित शर्माचा मुश्किल झेल मी घेईन याचीही मला कल्पना नव्हती. परंतु झेल टिपल्यानंतर मला आनंद झाला, असं ट्रॅविस हेड म्हणाला.
सबसे मुश्किल है रोहित शर्मा को रोते हुए देखना#RohithSharma𓃵 #Worlds2023 #INDvsAUS pic.twitter.com/1Ou9UMObTP
— आपणो राजस्थान 🏵️ (@Sanjay10783423) November 19, 2023
हेही वाचा – WorldCup : विश्वचषक आतापर्यंत कोणत्या देशाने कधी जिंकला? सर्व माहिती एका क्लिकवर
दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 54, 47 धावांचे आणि सूर्यकुमार यादवने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली. याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.