घरक्रीडाविराट कोहलीचं कतृत्व मोठं की शाहरुख खानचं? दोघांच्या चाहत्यांमध्ये रंगलं ट्ववीटर वॉर

विराट कोहलीचं कतृत्व मोठं की शाहरुख खानचं? दोघांच्या चाहत्यांमध्ये रंगलं ट्ववीटर वॉर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तर भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या खेळाचे देखील अनेक चाहते आहेत. या दोघांना आपापल्या क्षेत्रातील दिग्गज समजले जाते. त्यामुळेच या दोघांचे जगभरात करोडो चाहते आहेत. अशातच या दोघांच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त ट्वीटर वॉर सुरु झालं आहे. काहींनी विराट कोहलीला मोठं म्हटलंय तर काहींना शाहरुखला मोठं म्हटलं आहे.

असा सुरु झाला वाद

खरं तर, विराट प्रमाणेच शाहरुखदेखील क्रिकेटचा चाहता आहे. IPL मध्ये विराट कोहली RCB मधून खेळतो. तर IPL मधील KKR ही शाहरुखची टीम आहे. त्यामुळे अनेकदा IPL च्या काळात या दोन्ही टीममध्ये सोशल मीडिया वॉर पाहायला मिळतात. मात्र, आता IPL सुरु व्हायच्या आधीच हा वॉर सोशल मीडियावर सुरु झाला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सध्या सोशल मीडियालवर दोघेही आपापल्या सुपरस्टार्सला सपोर्ट करताना दिसत आहेत. शाहरुख खानच्या एका चाहत्याने ट्विट केले की, “विराट कोहली स्वतः शाहरुख खानपासून प्रेरित आहे. कोहलीच्या चाहत्यांनी आयपीएलमध्ये किडनी, फुफ्फुस आणि हृदय जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि 2011 मध्ये जन्मलेल्या विराटची तुलना ग्रेट शाहरुख खानशी करू नये. यावर विराट कोहलीच्या एका चाहत्याने कमेंट करून लिहिले की, “ऑस्ट्रेलियामध्ये एक लाख लोक कोहलीचा जप करतात, जे शाहरुखने त्याच्या 35 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे आहे.”

 


हेही वाचा :

खूप घाणेरडी भाषा आहे त्याची… माधुरीवरील आक्षेपार्ह टिप्पणीवर जया बच्चन संतापल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -