घरक्रीडाफिफाचा आज डबल धमाका!!!

फिफाचा आज डबल धमाका!!!

Subscribe

आजपासून एकाच गटातील चार टीम्सचे दोन दोनच्या ग्रुपने वेगवेगळ्या मैदानावर सामने होतील. म्हणजे आता फिफाच्या फॅन्सना एकाच वेळेस दोन मॅच पाहण्याचे कठीण काम करावे लागणार आहे.

फिफाचा २१वा विश्वचषक रशियात धमाकेदार पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने अतिशय चुरशीचे झाले आहेत. आतापर्यंत दररोज फिफाचे ३ सामने होत आहेत. मात्र आजपासून या सामन्यांच्या वेळापत्रकात एक बदल होणार आहे. आता रोज एकाच वेळी दोन मॅचस खेळल्या जाणार आहेत. एकाच गटातील चारही संघाचे दोन सामने एकाचवेळी वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. या निर्णयामुळे कुठेतरी फुटबॉल फॅन्सचा हिरमोड होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. आजपासून एकाच गटातील चार टीम्सचे दोन दोनच्या ग्रुपने वेगवेगळ्या मैदानावर सामने होतील. म्हणजे आता फिफाच्या फॅन्सना एकाच वेळेस दोन मॅच पाहण्याचे कठीण काम करावे लागणार आहे.

आजच्या सामन्यात सर्वात आधी ग्रुप ए चे सामने होतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता यजमान संघ रशिया उरूग्वेसोबत भिडणार आहे. तर त्याच वेळेस सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्यातही सामना रंगणार आहे. रशिया आणि उरुग्वे हे दोन्ही संघ आतापर्यंत विश्वचषकात सलग दोन सामने जिंकल्यामुळे आधीच बाद फेरीत पोहचले आहेत. मात्र कोणता संघ किती गुणांनी बाद फेरीत जातो यासाठी आजची मॅच पाहणे औत्सुक्याचे राहील. तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि इजिप्त यांचे या विश्वचषकातील आव्हान याआधीच संपुष्टात आले असले तरी शेवट गोड करण्यासाठी दोन्ही संघ मेहनत करतील.

- Advertisement -

यानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.३० वा. ग्रुप बी मधील सामने सुरू होतील. ग्रुप बी मध्ये सर्वच फिफा फॅन्सचे लक्ष लागलेले स्पेन आणि पोर्तुगाल हे संघ आहेत. या दोन्ही संघांचा आपला पहिला सामना बरोबरीत सुटला आहे तर दुसरा सामना त्यांनी जिंकला होता. त्यामुळे दोघांचेही बाद फेरीत जाणे त्यांच्या आजच्या कामगिरीवर अवलंबून असेल. यामध्ये स्पेन विरुद्ध मोरोक्को आणि पोर्तुगाल विरुद्ध इराण एकमेकांसोबत लढणार आहे. मोरोक्कोने आपले दोन्ही सामने गमावले आहेत, त्यामुळे विश्वचषतकातील शेवटचा सामना जिंकण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतील. तर स्पेन बाद फेरीत जाण्यासाठी आजचा सामना जिंकण्यासाठी खेळतील. तर दुसरीकडे पोर्तुगाल आणि इराण यांच्यात चुरशीचा सामना होईल, कारण दोघांतील जो जिंकेल तो थेट बाद फेरीत जाणार आहे.

रोनाल्डोवर सर्वांचे लक्ष

पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आजच्या सामन्यात कसा खेळतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याने या विश्वचषकातील सर्वात पहिली हॅट्रीक नोंदविली असून तो टॉप गोल करणाऱ्यांच्या रेसमध्ये बेल्जियमच्या लुकाकूसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा हॅरी केन ५ गोलसोबत पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

cristiano ronaldo
ख्रिस्तियानो रोनाल्डो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -