Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Dinesh Kartik : दिनेश कार्तिकच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन; जुळ्या मुलांचा झाला...

Dinesh Kartik : दिनेश कार्तिकच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन; जुळ्या मुलांचा झाला बाप, नावही ठरलं

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज खेळाडू दिनेश कार्तिकच्या घरी दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या घरी दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. कार्तिकची बायको आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल हिने गुरूवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिली. या खेळाडू जोडप्याने सोशल मीडियावर फोटो शेयर करून आम्ही आई बाबा झाल्याची माहिती दिली. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांच्या घरी जुळ्या पुत्रांचे आगमन झाले असून सोबतच कार्तिक आणि दीपिका पल्लीकलचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दिनेश कार्तिकनेही सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करून सर्वांना आनंदाची बातमी दिली की तो आणि पत्नी दीपिका पल्लीकल जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. दिनेश कार्तिकने फोटोंसह त्याची प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही नुकतेच तीनाचे पाच झालो आहोत, दीपिका आणि मला दोन सुंदर जुळ्या मुलांच्या रूपात आशीर्वाद मिळाला आहे. आमच्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट असू शकत नाही,” अशा शब्दात कार्तिकने त्याचा आनंद व्यक्त करून सर्वांना आणखी एक बातमी दिली, ती म्हणजे सोबतच कार्तिकने मुलांचे नावही शेअर केली आहेत. कबीर पल्लीकल कार्तिक आणि जियान पल्लीकल कार्तिक अशी त्यांची नावे आहेत.

- Advertisement -

दीपिकानेही आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सोबतच मुलांसोबत तिचे फोटो देखील शेअर केले आहेत. विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मापासून अनेक दिग्गजांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिनेश कार्तिक आणि दिपीका पल्लीकलचा नोव्हेंबर २०१३ मध्ये साखरपुडा झाला होता, आणि दोन वर्षानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी लग्न केले होते.

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -