कॉमनवेल्थ गेम्स संपल्यानंतर बर्मिंगहॅममध्ये 2 पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता, पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनची माहिती

कॉमनवेल्थ गेम्स संपल्यानंतर बर्मिंगहॅममध्ये 2 पाकिस्तानी बॉक्सक बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनने दिली आहे.पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे (PBF)सचिव नासिर तांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान बलोच आणि नझीरुल्लाह हे दोन बॉक्सर इस्लामाबादला रवाना होण्याच्या काही तास आधीच हे गायब झाले आहेत.

दोन्ही बॉक्सरचे शोध घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आता इंग्लंड सरकारशी संपर्क साधला आहे. पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनने या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बेपत्ता बॉक्सर काल(मंगळवार) न्याहारी करताना त्यांच्या सहकाऱ्यांना भेटले असल्याचं सांगितलं जात आहे.

या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने दोन सुवर्णपदकांसह ८ पदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंग आणि भालाफेकमध्ये पाकिस्तानने सुवर्ण कामगिरी केली. मात्र, बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानला एकही पदक जिंकता आले नाही. दरम्यान, पाकिस्तानचे खेळाडू गायब झाल्याची ही मागील दोन महिन्यांमधील दुसरी घटना आहे. याआधी हंगेरीमध्ये फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेला पाकिस्तानचा जलतरणपटू फैजान अकबर हा देखील बेपत्ता झाला होता. अद्यापही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाहीये.

बर्मिंगहॅममध्ये श्रीलंकेचे खेळाडूही गायब झाले आहेत. सुरूवातीला ज्युडो खेळाडू चमिला डिलानी आणि तिची मॅनेजर एसेला डीसिल्वा, कुस्तीपटू शनिथ गायब झाले होते. त्यानंतर एकामागोमाग एक सात खेळाडू गायब झाल्याने श्रीलंकेच्या पथकाची चिंता वाढली असून त्यांच्याकडे सहा महिन्यांचा व्हिसाही असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा :ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या महिला कर्णधाराचा क्रिकेटपासून काही काळासाठी दूर राहण्याचा मोठा निर्णय