घरक्रीडाRanji Trophy 2022: अंडर-१९च्या कॅप्टनचं दुसरं शतक, ८८ वर्षांमध्ये रेकॉर्ड करणारा...

Ranji Trophy 2022: अंडर-१९च्या कॅप्टनचं दुसरं शतक, ८८ वर्षांमध्ये रेकॉर्ड करणारा ठरला तिसरा खेळाडू

Subscribe

दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यात आज(रविवार) रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील दुसरी इनिंग सुरू आहे. या सामन्यात अंडर-१९ वर्ल्ड कपचा कॅप्टन यश ढूलने ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. रणजी पदार्पणातील दोन्ही इंनिंगमध्ये त्याने शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तसेच रणजी स्पर्धेच्या ८८ वर्षांच्या इतिहासात पदार्पणातील वर्षांमध्ये रेकॉर्ड करणारा हा तिसरा फलंदाज ठरला आहे.

यश ढूलने पहिल्या डावात दमदार शतक झळकावलं. त्यानंतर दुसऱ्याही इनिंगमध्ये त्याने १३ चौकार मारत शतकीय खेळी पूर्ण केली. तामिळनाडूने पहिल्या इनिंगमध्ये दिल्लीवर ४२ धावांची आघाडी घेतली होती. परंतु त्याला उत्तर देताना दिल्लीनं दमदार सुरूवात केली. दरम्यान, पहिल्या इनिंगमध्ये यशने ११३ धावा काढल्या होत्या.

- Advertisement -

अंडर-१९ विश्वविजेता कॅप्टन यशने दोन्ही इनिंगमध्ये शतकं झळकावून दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले. हा पराक्रम करणारा तो टीम इंडियाचा तिसरा फलंदाज आहे. याआधी गुजरातकडून नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी १९५२-५३ मधील सिझनमध्ये आणि महाराष्ट्राकडून विराग आवटेने २०१२-१३ मधील सिझनमध्ये ही कामगिरी केली होती.

- Advertisement -

यशच्या उत्कृष्ट अशा शतकानंतर ललित यादवसह दिल्लीने पहिल्या इनिंगमध्ये ४५२ धावा काढल्या. त्यानंतर तामिळनाडूकडून पहिल्या इनिंगमध्ये शाहरूख खानच्या १९४ धावांच्या जोरावर ४९४ धावा करत आघाडी मिळवली होती. तर दुसऱ्या इनिंगमध्ये दिल्लीने एकही विकेट न गमावता २८० धावा पूर्ण केल्या होत्या. यामध्ये यशने ११३ धावा आणि ध्रुवने १०७ धावा करत नाबाद ठरला होता.

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार

दरम्यान, १२ आणि १३ फेब्रुवारी दरम्यान आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनची लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. तर काही खेळाडू अनलकी ठरले. मात्र, यश ढुलला दिल्ली कॅपिटल्स या संघाने खरेदी केलं आहे. तसेच अंडर-१९ वर्ल्ड कपनंतर आयपीएल खेळण्यास तो सज्ज झाला आहे.


हेही वाचा : India vs Sri Lanka: सिलेक्टर्स डोकच वापरत नसल्याची दिलीप वेंगसरकरांची टीका, तरूण खेळाडूंना डच्चू दिल्याने चिडले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -