नवी दिल्ली : मलेशियामध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील टी 20 विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय महिला संघाने सलग तिसरा विजय मिळवत सुपर 6 मध्ये जागा निश्चित केली. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध 26 चेंडूत तर मलेशियाविरुद्ध 17 चेंडूत विजय मिळवला होता. त्यांनतर गुरुवारी (23 जानेवारी) भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 118 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेची 20 षटकांत 9 बाद 58 धावा करत 60 धावांनी दणदणीत विजय मिळवला. (U19 T20I World Cup Indian team entered in super six)
हेही वाचा : Jos Buttler : टी-20 मालिकेआधीच वादाची शक्यता, इंग्लंडच्या कर्णधाराचा बीसीसीआयच्या नियमांना विरोध
पहिले फलंदाजी करताना भारतीय संघाकडून त्रिशा गोंगडीने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. पण इतर कोणत्याही फलंदाजाला तिची साथ देता आली नाही. अशामध्ये मधल्या फळीत खेळणाऱ्या कमालिनी जीने 5 धावा, भाविका अहिरेने 7 धावा तसेच, आयुशी शुक्लाने 5 धावा केल्या. तसेच यावेळी सानिका चाळलेला भोपळाही फोडता आला नाही. तर, कर्णधार निकि प्रसादने 11 धावा, मिथिला विनोदने 16 धावा तर जोशिथा व्ही जेने 14 धावा करत भारतीय धावसंख्या 118 पर्यंत पोहचण्यास मदत झाली. तर श्रीलंकेकडून प्रमुदी मेथसरा, लिमान्सा थिलकरत्ने आणि असेनी थलागुणे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
118 धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला जास्तकाळ टिकाव धरता आला नाही. शबमन आणि जोशिथा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यावेळी फक्त 12 धावांवर निम्मा संघ तंबूत परतला होता. तर, श्रीलंकेची कर्णधार मनुदी ननयक्कारा धावबाद केले होते. रश्मिशा सेव्वांडीने 15 धावांची खेळी एक बाजू टिकवून धरण्याचा प्रयत्न केला पण परुनिका सिसोदियाने तिची विकेट घेतली. सिसोदियाने दुसरी विकेट घेताना लिमान्साला 6 धावांवर बाद केले. तर, 20 षटकांमध्ये 9 बाद 58 धावाच करता आल्या. सुपर सिक्समध्ये आता 12 संघाची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, भारत आणि बांगलादेश तर दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अमेरिका, नायजेरिया, आयर्लंड व न्यूझीलंड यांचा समावेश आहे.