Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाU19 WC 2024 Final : भारताकडे वचपा काढण्याची संधी; 6 महिन्यांत दुसऱ्यांदा...

U19 WC 2024 Final : भारताकडे वचपा काढण्याची संधी; 6 महिन्यांत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाशी भिडणार

Subscribe

नवी दिल्ली : 19 वर्षांतखालील विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 विकेट राखून पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे आता येत्या 11 फेब्रुवारीला बेनोनी येथील विलोमूर पार्कवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांत भारत आणि ऑस्ट्रेलिया आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया वरिष्ठ संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ विजयी झाला होता. मात्र आता भारताच्या युवा संघाकडे वरिष्ठ संघाच्या पराभवाचा वचवा काढण्याची संधी आहे. (U19 WC 2024 Final India chance to win Will clash with Australia for the second time in 6 months)

हेही वाचा – Mumbai Sea Link : मुंबईत होणार आणखी एक सागरी पूल, ‘या’ मार्गावरील प्रवास होणार सुखकर

- Advertisement -

विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत, भारत आणि ऑस्ट्रेलिया वरिष्ठ संघ आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमध्ये सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 240 धावा केल्या. भारताकडून मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा संघ 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत.

- Advertisement -

विश्वचषकात भारताची कामगिरी

19 वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ अद्याप एकही सामना हरलेला नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाला अंतिम सामन्यात विश्वचषक 2023 चा वचवा काढण्याची संधी आहे. भारताकडून कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धस, सौमी पांडे यांसारखे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी या खेळाडूंवर असेल. तसेच याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत आमि दोन्ही वेळेला भारताने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भारताने आतापर्यंत पाचवेळा आयसीसी अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फेरीत 100 टक्के रेकॉर्ड असलेला भारतीय संघ विजेतेपदाचा षटकार ठोकण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा – Nitesh Rane : “अभिषेक घोसाळकरांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळेच”, नितेश राणेंचा दावा

दुसऱ्या उपांत्य सामन्यात काय झाले?

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवत 19 वर्षांखालील स्पर्धेच्या अंतिम फेरी धडक मारली. बेनोई इथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली होती, मात्र त्यांनी एक विकेट राखून विजय मिळवला. रॅफ मॅकमिलनने नाबाद 19 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत पोहचवले. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानतर्फे अली रझाने 4, तर मिन्हासने 2 विकेट्स घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -