U19 Women’s T20 World Cup: पहिल्यांदाच खेळवलं जाणार महिला U19 T20 विश्वचषक, कोणते १२ संघ झाले क्वालिफाय?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) मागील वर्षी एक मोठा निर्णय घेतला होता. आयसीसीने २०२३ ते २०३१ या कालावधीसाठी क्रिकेटची घोषणा केली होती. परिषदेने यामध्ये पुरूषांची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकही पुरूष संघाप्रमाणेच खेळवला जाणार आहे.

१६ संघांमध्ये होणार सामना

महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार आहेत. यापूर्वीच पहिल्या हंगामासाठी क्वालिफिकेशनला सुरूवात झाली आहे. महिला अंडर-१९ T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासह अनेक संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण १६ संघ खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेला आगामी वर्षातील जानेवारीमध्ये सुरूवात होणार आहे.

हे १२ संघ ठरले पात्र

महिला अंडर-१९T20 विश्वचषकासाठी १२ संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे अशा ११ पूर्ण सदस्य देशांचा समावेश आहे. यावेळी युनायटेड स्टेट्स हे सदस्य राष्ट्र असल्यामुळे त्यांना स्वयंचलित पात्रता देण्यात आली आहे. उर्वरित चार जागांसाठी अनेक देशांदरम्यान स्पर्धा होणार आहेत. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंडर-19 T20 विश्वचषकासोबतच ICC महिला T20 विश्वचषकही खेळवला जाणार आहे.

…क्वॉलीफिकेशन राऊंडला होणार ३ जूनपासून सुरूवात

आयसीसी अंडर-१९ महिला टी-20 विश्वचषकाच्या क्वॉलीफिकेशन राऊंडला ३ जूनपासून सुरूवात होणार आहे. यामध्ये आशिया, युरोप, पूर्व आशिया-पॅसिफिक (EAP) आणि आफ्रिकेतील नऊ संघ ICC अंडर-१९ महिला T20 विश्वचषक स्पर्धेत चार क्वॉलीफिकेशन स्पॉट्ससाठी स्पर्धेत उतरणार आहेत. तर ९ जूनपर्यंत मलेशियामध्ये आशिया क्वॉलीफायरसाठी तिसऱ्या फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. भूतान, मलेशिया, नेपाळ, थायलंड, कतार, यूएई हे सहा संघ आशिया क्वॉलीफायर स्पर्धेत भाग घेणार आहेत. हे सर्व संघ एकूण १५ सामने खेळणार आहेत. ज्यामध्ये मुख्य स्पर्धेतील विजेत्याला स्थान दिले जाणार आहे.


हेही वाचा : दक्षिण कोरियाने पटकावले हॉकी आशिया चषक २०२२ चे जेतेपद; पाचव्यांदा चषकावर कोरले नाव