उदय देशपांडे यांना जीवन गौरव

सिद्धांत, मोनिका, विकास, सायली, मानधना यांना शिवछत्रपती पुरस्कार

Uday Deshpande

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी घोषणा केली. यामधील जीवन गौरव पुरस्कार हा मल्लखांब क्षेत्रात प्रशिक्षण देणारे उदय देशपांडे यांना घोषित झाला आहे. रविवार, १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे होणार्‍या समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांमध्ये विविध क्रीडाप्रकांतील ५५ खेळाडूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक/कार्यकर्ते या विभागात ७ पुरस्कारांचा तर एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू यामध्ये ९ पुरस्कारांचा समावेश आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार १५ जणांना घोषित करण्यात आला. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, ब्लेझर देण्यात येईल. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा, एकलव्य राज्य क्रीडा आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्यांना एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि ब्लेझर देऊन गौरविण्यात येईल.या पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी यावेळी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री तावडे यांनी पुरस्कांची घोषणा करताना सांगितले.

पुरस्कार विजेते :

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार –
उदय देशपांडे, मुंबई शहर

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार –
(i) सांघिक क्रीडा प्रकार : अमेय जोशी (औरंगाबाद, जिम्नॅस्टिक्स), सागर कुलकर्णी (औरंगाबाद, जिम्नॅस्टिक्स), गजानन पाटील (पुणे, अ‍ॅथलेटिक्स)

(ii) वैयक्तिक क्रीडा प्रकार : मृणालीनी औरंगाबादकर (पुणे, बुध्दीबळ), संजय माने (मुंबई, कुस्ती), डॉ. भूषण जाधव (ठाणे, तलवारबाजी), उमेश कुलकर्णी (पुणे, तायक्वोंदो), बाळकृष्ण भंडारी (पुणे, तायक्वोंदो), स्वप्नील धोपाडे (अमरावती, बुध्दीबळ), निखिल कानेटकर (पुणे, बॅडमिंटन), सत्यप्रकाश तिवारी (मुंबई उपनगर, बॅडमिंटन), दिपाली पाटील (पुणे, सायकलिंग)

(iii) सांघिक क्रीडा प्रकार : पोपट पाटील (सांगली, कबड्डी), राजेंद्र शेळके (सातारा, रोईंग), लक्ष्मीकांत खंडागळे (अमरावती, वॉटरपोलो)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) –

तिरंदाजी : प्रविण जाधव (सातारा), भाग्यश्री कोलते (पुणे)

अ‍ॅथलेटिक्स : सिध्दांत थिंगालाया (मुंबई उपनगर), मोनिका आथरे (नाशिक), कालिदास हिरवे (सातारा), मनिषा साळुंखे (सांगली)

जलतरण : श्वेजल मानकर (पुणे), युगा बिरनाळे (पुणे)

कॅरम : पंकज पवार (ठाणे), मैत्रेयी गोगटे (रत्नागिरी)

जिम्नॅस्टिक्स : सागर सावंत (मुंबई उपनगर), दिशा निद्रे (मुंबई शहर)

टेबल टेनिस : सनिल शेट्टी (मुंबई उपनगर)

बॅडमिंटन : अक्षय राऊत (बीड), नेहा पंडीत (पुणे)

बॉक्सिंग : भाग्यश्री पुरोहित (मुंबई)

रोईंग : राजेंद्र सोनार (नाशिक), पुजा जाधव (नाशिक)

नेमबाजी : हर्षदा निठवे (औरंगाबाद)

वेटलिफ्टींग : दिक्षा गायकवाड (अमरावती)

शरीरसौष्ठव : दुर्गाप्रसाद दासरी (कोल्हापूर)

मल्लखांब : सागर ओव्हळकर (मुंबई उपनगर)

कबड्डी : विकास काळे (पुणे), सायली केरीपाळे (पुणे)

कुस्ती : उत्कर्ष काळे (पुणे)

खो-खो : अनिकेत पोटे (मुंबई उपनगर)

ट्रायथलॉन : अक्षय कदम (सांगली)

वुशु : शुभम जाधव (कोल्हापूर), श्रावणी कटके (पुणे)

स्केटींग : सौरभ भावे (पुणे)

हॅण्डबॉल : महेश उगीले (लातूर), समीक्षा इटनकर (नागपूर)

तलवारबाजी : अक्षय देशमुख (नाशिक), रोशनी मुर्तडक (नाशिक)

बिलीयर्डस आणि स्नूकर : धृव सित्वाला (मुंबई शहर), सिध्दार्थ पारीख (मुंबई शहर)

पॉवरलिफ्टींग : मनोज मोरे (मुंबई उपनगर), अपर्णा घाटे (मुंबई शहर)

आटयापाटया : उन्मेश शिंदे (वाशिम), गंगासागर शिंदे (उस्मानाबाद)

बुध्दीबळ : राकेश कुलकर्णी (ठाणे), दिव्या देशमुख (नागपूर), रोनक साधवानी (नागपूर), सलोनी सापळे (पुणे), हर्षिद राजा (पुणे)

टेनिस : ऋतुजा भोसले (पुणे)

व्हॉलीबॉल : प्रियांका बोरा (पुणे)

सायकलिंग : रविंद्र करांडे (अहमदनगर), वैष्णवी गभणे (भंडारा)

स्क्वॉश : महेश माणगावकर (मुंबई उपनगर), उर्वशी जोशी (ठाणे)

क्रिकेट : स्मृती मानधना (सांगली)

हॉकी : सुरज करकेरा (मुंबई)

एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) –

संदिप गुरव (रायगड, व्हीलचेअर-तलवारबाजी), मानसी जोशी (मुंबई, बॅडमिंटन), मार्क धर्माई (मुंबई उपनगर, बॅडमिंटन), रुही शिंगाडे (पालघर, बॅडमिंटन), सुकांत कदम (सांगली, बॅडमिंटन), गीतांजली चौधरी (ठाणे, जलतरण), स्वरुप उन्हाळकर (कोल्हापूर, नेमबाजी), चेतन राऊत (अमरावती, जलतरण), आदिल मोहमंद नाझिर अन्सारी (तिरंदाजी)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी) –

श्रीमती प्रियांका मंगेश मोहिते (सातारा, गिर्यारोहण)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) –

मुंबई- अंकुर आहेर (ठाणे), पुणे- महेश गादेकर (सोलापूर), कोल्हापूर- मुन्ना कुरणे (सांगली), अमरावती- नितीन चवाळे (अमरावती), नाशिक- संजय होळकर (नाशिक), लातूर- जनार्दन गुपिले (नांदेड), नागपूर- राजेंद्र भांडारकर (भंडारा)