Champions League 2022 : रिअल मॅड्रिड 14 व्यांदा चॅम्पियन, लिवपूरलचा 1-0 ने पराभव

UEFA Champions League 2022 Real Madrid 14 time champions against Liverpool fc
Champions League 2022 : रिअल मॅड्रिड 14 व्यांदा चॅम्पियन, लिवपूरलचा 1-0 ने पराभव

यूईएफए चॅम्पियन लीग 2022 च्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लिश फूटबॉल क्लब लिवरपूल आणि स्पॅनिश क्लब रिअल मॅड्रिडमध्ये चुरशीची लढत झाली. या सामन्यात रिअल मॅड्रिडने 1-0 ने विजय मिळवत १४ व्यांदा चॅम्पियनशीप पटकावली आहे. रिअल मॅड्रिडकडून एकच गोल करण्यात आला आणि तो ब्राझीलच्या विंगर विनीसियस जूनियरने 59 व्या मिनीमध्ये केला आहे. लिवरपूलला 4 वेळा फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. रिअलने मागील वेळी 2018 मध्ये पराभूत केले होते. रिअलची टीम 1981 पासून आतापर्यंत एकाही अंतिम फेरीत पराभूत झाली नाही.

चॅम्पियन्स लिगमध्ये इंग्लिश फूटबॉल कल्ब लिवरपूल आणि स्पॅनिश क्लब रिअल मॅड्रिडमध्ये 3 मिनिट उशीरा सामना सुरु झाला. या सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. विनीसियसने एक गोल करुन विजय मिळवून दिला आहे. परंतु स्पर्धेचा खरा नायक टीमचा गोलकीपर थिबो कोर्त्वा ठरला आहे. त्याने 9 गोल वाचवले आहेत. अंतिम सामन्यात पहिल्यांदाच एवढे गोल एका गोलकीपरने वाचवले आहेत. कोर्त्वाने पॅरिसमध्ये सेंट जर्मेनविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत आठ आणि मँचेस्टर सिटीविरुद्धच्या उपांत्य फेरीत आठ गोल वाचवले.

भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून शुभेच्छा

रिअल मॅड्रिडच्या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विट करुन मॅड्रिड संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितने ट्विट करुन हाला मॅड्रिड अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

कार्लो एंजोलोटीचा विक्रम

रिअल मॅड्रिडचा मॅनेजर कार्लो एंजोलोटीने विक्रम केला आहे. सर्वाधिक चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंद झाला आहे. त्यांनी एसी मिलानसोबत 2002-03 मध्ये आपल्या नावे किताब केला होता. या नंतर रिअलसोबत 2013 ते 14 आणि 2021 ते 22 मध्ये चषक आपल्य नावे केले आहे. रिअल आणि लिवरपूलमध्ये चुरशीचा सामना झाला होता. मोहम्मद सालाह आणि थिबो कोर्त्वा गोल करण्यासाठी आमने-सामने आले होते. परंतु कोर्त्वाने पुन्हा एकदा नाराज केले. रिअलसाठी कोर्त्वाने पुन्हा आठव्यांदा गोल वाचवला. डॅनी कार्व्हालचा पास फेड्रिको व्हॅल्व्हर्डेने व्हिनीसियसच्या दिशेने ढकलला. विनीसियसने कोणतीही चूक न करता गोल केला. या गोलसह रिअलने १४व्यांदा चॅम्पियनशीप पटकावली आहे.


हेही वाचा : Mohammad Siraj : मोहम्मद सिराजला ट्रोल केल्यानंतर आरसीबीच्या डायरेक्टरनं केलं मोठं वक्तव्य